रेल्वे मंत्रालय

रेल्वे समितीने बिगर -तांत्रिक लोकप्रिय श्रेणीतील उमेदवारांच्या समस्या दूर केल्या


बिगर -तांत्रिक लोकप्रिय श्रेणींसाठी (CEN 01/2019) दुसऱ्या टप्प्यातील संगणक आधारित चाचणी (CBT) साठी वेतन स्तरानुसार 20 पट अधिक उमेदवार निवडले जाणार

सर्व वेतन स्तरांचे सुधारित निकाल एप्रिल 2022 च्या पहिल्या आठवड्यात घोषित केले जातील

RRC-01/2019 (स्तर-1) साठी एकाच टप्प्यात परीक्षा घेतली जाणार

Posted On: 10 MAR 2022 7:11PM by PIB Mumbai

 नवी दिल्ली, 10 मार्च 2022

रेल्वे मंत्रालयाने आदेश क्रमांक ERB-I/2022/23/06 दिनांक 26.01.2022 च्या अनुषंगाने CEN 01/2019 (बिगर  तांत्रिक लोकप्रिय श्रेणी) आणि CEN RRC-01/2019 (स्तर -1) च्या उमेदवारांच्या समस्यांमध्ये लक्ष घालण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे.  आता पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे.

CEN 01/2019 (बिगर -तांत्रिक लोकप्रिय श्रेणी) साठी दुसऱ्या टप्प्यातील संगणक आधारित चाचणी (CBT) साठी वेतन स्तरानुसार 20 पट अधिक  उमेदवार निवडले जातील.

● आधीच पात्र घोषित केलेले उमेदवार पात्र राहतील.

● अंतिम यादीपूर्वी निवड केलेल्या  अतिरिक्त उमेदवारांची यादी प्रत्येक वेतन स्तरावर अधिसूचित केली जाईल.

●  प्रत्येक वेतन स्तरासाठी आरआरबी निहाय 2 ऱ्या टप्प्यातील संगणक आधारित चाचणी बरोबरच आरआरबीच्या सर्व उमेदवारांना एकाच शिफ्टमध्ये सामावून घेण्यात आले. जिथे  क्षमतेच्या मर्यादांमुळे किंवा अन्य कारणामुळे सिंगल शिफ्ट शक्य नसेल तेथे टक्केवारी आधारित सामान्य प्रक्रिया केली जाईल.

● CEN RRC-01/2019 (स्तर-1) एकाच टप्प्यातील परीक्षा असेल. दुसऱ्या टप्प्यातील सीबीटी नसेल.

● स्तर-1 साठी आरआरसी निहाय सीबीटी  घेण्यात येईल. तसेच प्रत्येक आरआरसीसाठी शिफ्टची संख्या लक्षणीयरीत्या कमी करण्यासाठी आणि परीक्षा प्रक्रियेला गती देण्यासाठी जास्तीत जास्त उपलब्ध क्षमता वापरण्याची शिफारस केली आहे.

● पर्सेंटाइल आधारित सामान्य प्रक्रिया जी सुलभ आणि समजण्यास सोपी  आहे, जेथे शिफ्टची संख्या एकापेक्षा जास्त असेल तेथे वापरली जाईल.

● इंडियन रेल्वे मेडिकल मॅन्युअल (IRMM) मध्ये विहित  वैद्यकीय मानके स्तर-1 च्या विविध पदांसाठी वापरली जातील.

● आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभाग (EWS) अंतर्गत अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी कोणतेही उपलब्ध उत्पन्न आणि मालमत्ता प्रमाणपत्र वैध मानले जाईल.

CEN 01/2019 (बिगर  तांत्रिक लोकप्रिय श्रेणी) आणि CEN RRC-01/2019 (स्तर-1)चे वेळापत्रक (तात्पुरते)

● सर्व वेतन स्तरांचे सुधारित निकाल एप्रिल 2022 च्या पहिल्या आठवड्यात घोषित केले जातील.

●वेतन स्तर  6 साठी दुसऱ्या टप्प्यातील सीबीटी  मे, 2022 मध्ये होणार

● इतर वेतन स्तरांसाठी दुसऱ्या टप्प्यातील सीबीटी योग्य अंतराने घेतली जाणार

● दुसऱ्या टप्प्यातील सीबीटी  इत्यादी काढून टाकल्यामुळे स्तर -1 साठी सीबीटी आयोजित करण्यासाठी विशेष अटींसह सुधारित पद्धतीचे पालन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

● यामध्ये स्तर -1 साठी सीबीटी आयोजित करण्यासाठी अतिरिक्त पायाभूत सुविधा आणि लॉजिस्टिक्स व्यवस्था  करणे समाविष्ट असेल ज्यामध्ये प्रति शिफ्ट आवश्यकतेमध्ये लक्षणीय वाढ होईल. स्तर-1 साठी सीबीटी शक्य तितक्या लवकर आयोजित करण्यासाठी परीक्षा आयोजक संस्था  (ECA) स्थापन करण्याचा प्रयत्न केला जाईल.

● त्यामुळे स्तर -1 साठी सीबीटी  अंदाजे जुलै 2022 नंतर  होईल


S.Patil/S.Kane/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1804871) Visitor Counter : 234