भारतीय स्पर्धा आयोग
azadi ka amrit mahotsav

एचएसबीसी ॲसेट मॅनेजमेंट या खासगी मर्यादित कंपनीला एल अँड टी इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट या खासगी मर्यादित कंपनीचे 100 टक्के भाग भांडवल अधिग्रहित करण्यास भारतीय स्पर्धा आयोगाची मंजुरी

Posted On: 10 MAR 2022 3:08PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 मार्च 2022

भारतीय स्पर्धा आयोगाने एचएसबीसी ॲसेट मॅनेजमेंट या खासगी मर्यादित कंपनीला (एचएसबीसी एएमसी/ अधिग्रहण कर्ता) एल अँड टी इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट या (एल अँड टी एएमसी/लक्ष्य ठरलेल्या)खासगी मर्यादित कंपनीचे 100 टक्के भाग भांडवल अधिग्रहित करण्यास मंजुरी दिली आहे.

 प्रस्तावित एकीकरणाचा संबंध एचएसबीसी एएमसीतर्फे एल अँड टी होल्डिंग्स मर्या. (एल अँड टी प्रायोजक/ विक्रेता) या कंपनीकडून एल अँड टी एएमसी कंपनीच्या आणि तिच्या नामनिर्देशित कंपन्यांच्या  100 % भाग भांडवल अधिग्रहणाशी आहे. लक्ष्य कंपनीच्या इक्विटी समभागांचे अधिग्रहण स्पर्धा कायदा 2002 च्या कलन 5 (अ) अंतर्गत होणार आहे.

एचएसबीसी एएमसी/ अधिग्रहण कर्ता

एचएसबीसी एएमसी ही मालमत्ता व्यवस्थापन कंपनी असून एचएसबीसी म्युच्युअल फंडाच्या योजनांचा रोजचा व्यवहार पाहते. या फंडामध्ये जमा झालेल्या पैशांच्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी एचएसबीसी एएमसी या कंपनीची आहे. ही कंपनी एचएसबीसी होल्डिंग्स पीएलसी (एचएसबीसी ग्रुप) या कंपनीची संपूर्ण मालकी असलेली अप्रत्यक्ष उपकंपनी आहे आणि ती एचएसबीसी ग्रुपमधील कंपन्यांशी संबंधित आहे.

एल अँड टी एएमसी/लक्ष्य ठरलेली कंपनी

एल अँड टी एएमसी ही मालमत्ता व्यवस्थापन संस्था असून एल अँड टी म्युच्युअल फंडाच्या योजनांचा रोजचा व्यवहार पाहते. या फंडामध्ये जमा झालेल्या पैशांच्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी एल अँड टी एएमसी या कंपनीची आहे. ही कंपनी एल अँड टी स्पॉन्सरया कंपनीची संपूर्ण मालकी असलेली उपकंपनी आहे

भारतीय स्पर्धा आयोगाचा यासंदर्भातील तपशीलवार आदेश लवकरच जारी होईल.

 

 

 

 

Jaydevi PS/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1804722) Visitor Counter : 206