आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या समग्र कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत लसीच्या 179 कोटी 53 लाखांहून अधिक मात्रा देण्याचे काम पूर्ण


गेल्या 24 तासांत, कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या 18 लाख 23 हजारांहून अधिक मात्रा देण्यात आल्या

देशातील रोगमुक्ती दर सध्या 98.70%

गेल्या 24 तासांत देशात 4,184 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद

भारतातील सध्याची कोविड सक्रीय रुग्णसंख्या 44,488

साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 0.58% आहे

Posted On: 10 MAR 2022 9:17AM by PIB Mumbai

नवी दिल्ली 10 मार्च 2022

गेल्या 24 तासांच्या कालावधीत, कोविड प्रतिबंधक लसीच्या 18 लाख 23 हजारांहून अधिक  (18,23,329) मात्रा देण्यात आल्यामुळे, आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने 179 कोटी 53 लाखांचा (1,79,53,95,649) टप्पा ओलांडला आहे.

देशभरात 2,09,22,227 सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले. आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, आतापर्यंत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रांची गटनिहाय विभागणी पुढीलप्रमाणे आहे

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,02,375

2nd Dose

99,80,218

Precaution Dose

42,79,747

FLWs

1st Dose

1,84,11,037

2nd Dose

1,74,68,936

Precaution Dose

64,77,578

Age Group 15-18 years

1st Dose

5,56,54,876

2nd Dose

3,24,98,481

Age Group 18-44 years

1st Dose

55,29,72,639

2nd Dose

45,25,52,270

Age Group 45-59 years

1st Dose

20,24,67,568

2nd Dose

18,20,74,949

Over 60 years

1st Dose

12,65,52,468

2nd Dose

11,33,93,853

Precaution Dose

1,02,08,654

Precaution Dose

2,09,65,979

Total

1,79,53,95,649

 

गेल्या 24 तासांत 6,554 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे, देशात महामारीची  सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 4,24,20,120 झाली आहे.

 

परिणामी, भारतातील रोगमुक्ती दर आता 98.70% झाला आहे.

 

 

 गेल्या 24 तासांत, देशात 4,184 नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली.

 

भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या सध्या 44,488 इतकी आहे. देशात सध्या कोविड  असलेल्या रुग्णांचे प्रमाण आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या 0.10% आहे.

कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याच्या क्षमतेच्या विस्ताराचे काम देशभरात सुरु आहे. गेल्या 24 तासांत देशात एकूण 8,73,974 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 77 कोटी 60 लाखांहून अधिक (77,60,82,445)  चाचण्या करण्यात आल्या आहेत.

 

देशभरात कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याची क्षमता वाढविण्यात आली असतानाच, देशातील साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 0.58% आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 0.48%.इतका आहे.

 

***

Jaydevi PS/SC/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1804669) Visitor Counter : 233