युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला 11 मार्च रोजी तिसऱ्या राष्ट्रीय युवा संसद महोत्सवाच्या (NYPF) समारोप सोहोळ्याला संबोधित करणार तर महोत्सवाच्या राष्ट्रीय फेरीच्या उद्घाटन सत्राला केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर उद्या संबोधित करणार
प्रविष्टि तिथि:
09 MAR 2022 5:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 मार्च 2022
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर 10 मार्च 2022 रोजी राष्ट्रीय युवा संसद महोत्सव 2022 च्या राष्ट्रीय फेरीच्या उद्घाटन सत्राला संबोधित करतील. लोकसभा अध्यक्ष, ओम बिर्ला 11 मार्च 2022 रोजी नवी दिल्लीतील संसदेच्या मध्यवर्ती सभागृहा मध्ये तिसऱ्या राष्ट्रीय युवा संसद महोत्सवाच्या (NYPF) समापन सोहोळ्याला संबोधित करतील युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक सहभागींना प्रमाणपत्रांचे वितरण करतील. पहिल्या तीन राष्ट्रीय विजेत्यांना देखील समारंभाच्या वेळी लोकसभा अध्यक्षांसमोर बोलण्याची संधी मिळेल.
राष्ट्रीय युवा संसद महोत्सव
सार्वजनिक सेवांसह आगामी काळात विविध क्षेत्रात भरारी घेणाऱ्या तरुणाईचे विचार जाणून घेणे हे राष्ट्रीय युवा संसद महोत्सवाचे (NYPF) उद्दिष्ट आहे. राष्ट्रीय युवा संसद महोत्सव हा 31 डिसेंबर 2017 रोजी पंतप्रधानांनी त्यांच्या मन की बात द्वारे मांडलेल्या कल्पनेवर आधारित आहे.
N.Chitale/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1804433)
आगंतुक पटल : 237