आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारताच्या भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि युकेच्या ऑक्सफर्ड विद्यापीठ यांच्यातील सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
Posted On:
09 MAR 2022 4:31PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 मार्च 2022
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि यूकेच्या ऑक्सफर्ड विद्यापीठ यांच्यात नोव्हेंबर 2021 मध्ये नियम 7(d) (i) आणि भारत सरकारच्या द्वितीय अनुसूची (व्यवसाय व्यवहार) नियम 1961 नुसार झालेल्या सामंजस्य कराराची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाला माहिती देण्यात आली.
सामंजस्य कराराची उद्दिष्टे:
भारतीय शास्त्रज्ञ आणि संशोधकांसाठी क्षमता बांधणी करणे, आंतरराष्ट्रीय मानके आणि नियामक आवश्यकतांशी सुसंगत माहितीचे संकलन, स्वतःच्या निधीचा वापर करून क्षमता विकासासाठी प्रादेशिक केंद्र बनण्याच्या दिशेने भारताचा विकास आणि समान न्याय तसेच सार्वभौमत्वाच्या तत्त्वांचे पालन करणे, आयसीएमआरमध्ये परिणाम साध्य करण्यासाठी आयडीडीओ सचिवालयाच्या कालबद्ध सहकार्याने संयुक्तपणे निधी उभारणे आणि समान न्याय आणि पारदर्शकतेसह माहिती (डेटा) तसेच कौशल्य सामायिकरण या पलीकडील भागीदारी निर्माण करणे ही या सामंजस्य करारांतर्गतची उद्दिष्टे आहेत.
दोन्ही पक्षांनी निर्मूलन टप्प्यातील तीन कीटकजन्य आजारांबाबत (मलेरिया, व्हिसेरल लेशमॅनियासिस, फायलेरियासिस) आणि नव्या संक्रमणाबाबत विचारांची देवाणघेवाण करण्याचे मान्य केले आहे.
डेटा व्यवस्थापन, डेटा दस्तऐवजीकरण, डेटा सामायिक करणे, न्याय्य प्रशासन चौकट विकसित करणे, संशोधन कार्यक्रमांवरील सहकार्यासाठी संधी शोधणे आणि क्षमता बळकटीकरण, संशोधन अभ्यासकांची देवाणघेवाण, डेटा व्यवस्थापन आणि सांख्यिकीय विश्लेषण यावर तीन वर्षांची कार्य योजना विकसित करणे यासाठी सर्वोत्तम पाठींबा दिला जाईल.
आर्थिक परिणाम:
या सामंजस्य कराराद्वारे परिकल्पित केलेल्या सहकार्याच्या संबंधात प्रत्येक पक्ष स्वतःचा खर्च उचलतील. जर नंतर पक्षांनी या सामंजस्य कराराद्वारे ठरवलेल्या कामापैकी एका घटकाकरता निधी सुरक्षित केला आणि त्या निधीचा काही भाग इतर पक्षांना पाठवायचा असेल तर, संबंधित कार्याच्या नियंत्रणासाठी अतिरिक्त करार अंमलात आणला जाईल.
Jaydevi PS/V.Ghode/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1804411)
Visitor Counter : 218
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam