नागरी उड्डाण मंत्रालय
410 भारतीयांना विशेष नागरी विमानांनी युक्रेनच्या शेजारी देशांतून परत आणले गेले
आतापर्यंत जवळपास 18 हजार भारतीयांना विशेष विमानांनी परत आणले गेले
Posted On:
08 MAR 2022 6:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 मार्च 2022
युक्रेनच्या शेजारी देशांतून भारतीयांची सुटका सुरु करण्यात आलेल्या ‘ऑपरेशन गंगा’ अंतर्गत 410 भारतीयांना आज 2 विशेष नागरी विमानांनी सुचावा येथून परत आणण्यात आले. यासोबतच 22 फेब्रुवारी 2022 रोजी सुरु झालेल्या या मोहिमेत जवळपास 18 हजार भारतीयांना विशेष विमानांनी मायदेशी परत आणण्यात आले आहे. नागरी विमानांनी परत आणलेल्या भारतीयांची संख्या 15521 इतकी झाली आहे. ऑपरेशन गंगा अंतर्गत भारतीय वायुदलाने 2467 प्रवाशांना परत आणण्यासाठी 12 मोहीम उड्डाणे केली आणि 32 टन मदत साहित्य वाहून नेले.
नागरी विमानांनी, 21 विमानांनी 4575 प्रवाशांना बुखारेस्ट येथून, 9 विमानांनी 1820 प्रवाशांना सुचावा येथून, 28 विमानांनी 5571 प्रवाशांना बुडापेस्ट येथून, 5 विमानांनी 909 प्रवाशांना कॉशीक्जे येथून, 11 विमानांनी 2404 भारतीयांना शाझाव येथून आणि 242 व्यक्तींना एका विमानाने कीव्ह येथून परत आणण्यात आले.
Airline wise data is as follows:
|
Airlines
|
No of flights
|
Pax
|
Air Asia
|
3
|
500
|
Air India
|
14
|
3250
|
Air India Express
|
9
|
1652
|
Go First
|
6
|
1101
|
Indigo
|
34
|
7404
|
SpiceJet
|
9
|
1614
|
Grand Total
|
75
|
15521
|
* * *
R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1804044)
Visitor Counter : 174