आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

देशात एकूण 177.50 लाखांपेक्षा अधिक कोविड प्रतिबंधात्मक लसींच्या मात्रा देण्यात आल्या


गेल्या 24 तासात 5 लाखांपेक्षा अधिक कोविड मात्रा देण्यात आल्या

सध्या देशात रुग्ण बरे होण्याचा दर 98.56%

गेल्या 24 तासात देशभरात 8,013 नवे कोविड रुग्ण आढळले

सध्या देशातील एकूण उपचाराधीन रुग्णांची संख्या 1,02,601

साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर सध्या 1.17%

Posted On: 28 FEB 2022 2:37PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 फेब्रुवारी 2022

 

देशात गेल्या 24 तासात कोविड प्रतिबंधात्मक लसींच्या एकूण 5 लाखांपेक्षा अधिक मात्रा (4,90,321) देण्यात आल्या असून , त्यामुळे आतापर्यंत लसींच्या मात्रा घेणाऱ्यांची एकूण संख्या 177.50 कोटींच्या वर (1,77,50,86,335) पोहोचली असल्याचे आज सकाळी सात वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या प्राथमिक  अहवालात म्हटले आहे.

एकूण 2,03,49,590 सत्राद्वारे ह्या मात्रा देण्यात आल्या. सकाळी सात वाजेपर्यंतच्या अहवालानुसार, लसीकरणाच्या गटनिहाय वर्गवारीनुसार ताजी आकडेवारी खालीलप्रमाणे :

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,01,535

2nd Dose

99,66,398

Precaution Dose

41,70,997

FLWs

1st Dose

1,84,09,452

2nd Dose

1,74,41,370

Precaution Dose

62,17,332

Age Group 15-18 years

1st Dose

5,47,94,459

2nd Dose

2,74,87,370

Age Group 18-44 years

1st Dose

55,17,49,258

2nd Dose

44,38,98,708

Age Group 45-59 years

1st Dose

20,22,64,101

2nd Dose

18,00,84,662

Over 60 years

1st Dose

12,64,03,004

2nd Dose

11,21,74,641

Precaution Dose

96,23,048

Precaution Dose

2,00,11,377

Total

1,77,50,86,335

 

गेल्या 24 तासात,16,765 रुग्ण बरे झाले आहेत, त्यामुळे महामारीच्या सुरुवातीपासून बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या आता 4,23,07,686 इतकी झाली आहे. 

परिणामी, रुग्ण बरे होण्याचा दर 98.56% इतका झाला आहे.

गेल्या 24 तासात 8,013 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

देशात सध्या 1,02,601 उपचाराधीन रुग्ण आहेत.  देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.24% आहे.

देशभरात कोविड चाचण्या करण्याची क्षमता वाढवण्यात आली आहे. गेल्या 24 तासात, एकूण 7,23,828 जणांच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या. भारतात आतापर्यंत 76.74 कोटींपेक्षा अधिक (76,74,81,346) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशात चाचण्यांची क्षमता वाढवण्यात आली असून, सध्या देशात कोविडचा साप्ताहिक पॉझिटीव्हीटी दर 1.17% इतका तर दैनंदिन पॉझिटिव्हीटी दर 1.11% इतका आहे.

 

* * *

Jaydevi PS/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1801782) Visitor Counter : 199