आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

गेल्या 24 तासात 24.05 लाखापेक्षा अधिक कोविड मात्रा देण्यात आल्या


सध्या देशात रुग्ण बरे होण्याचा दर 98.54%

गेल्या 24 तासात देशभरात 10,273 नवे कोविड रुग्ण आढळले

सध्या देशातील एकूण उपचाराधीन रुग्णांची संख्या 1,11,472

साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर सध्या 1.26%

Posted On: 27 FEB 2022 9:17AM by PIB Mumbai

देशात गेल्या 24 तासात कोविड प्रतिबंधात्मक लसींच्या एकूण 24.05 लाखांपेक्षा अधिक मात्रा (24,05,049) देण्यात आल्या, त्यामुळे आतापर्यंत लसींच्या मात्रा घेणाऱ्यांची एकूण संख्या 177.44 कोटींच्या वर (1,77,44,08,129) पोहोचली असल्याचे आज सकाळी सात वाजेपर्यंतच्या प्राथमिक अहवालात म्हटले आहे.

एकूण 2,03,29,297 सत्राद्वारे ह्या मात्रा देण्यात आल्या. सकाळी सात वाजेपर्यंतच्या अहवालानुसार, लसीकरणाच्या गटनिहाय वर्गवारीनुसार ताजी आकडेवारी खालीलप्रमाणे :

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,01,503

2nd Dose

99,66,035

Precaution Dose

41,68,019

FLWs

1st Dose

1,84,09,384

2nd Dose

1,74,40,209

Precaution Dose

61,99,347

Age Group 15-18 years

1st Dose

5,47,63,188

2nd Dose

2,73,46,818

Age Group 18-44 years

1st Dose

55,16,99,378

2nd Dose

44,36,01,848

Age Group 45-59 years

1st Dose

20,22,56,014

2nd Dose

18,00,16,293

Over 60 years

1st Dose

12,63,96,009

2nd Dose

11,21,33,974

Precaution Dose

96,10,110

Precaution Dose

1,99,77,476

Total

1,77,44,08,129

गेल्या 24 तासात, 20,439 रुग्ण बरे झाले आहेत, त्यामुळे महामारीच्या सुरुवातीपासून बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या आता 4,22,90,921 इतकी झाली आहे. परिणामी, रुग्ण बरे होण्याचा दर 98.54% इतका झाला आहे.

गेल्या 24 तासात 10,273 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

 

देशात सध्या 1,11,472 उपचाराधीन रुग्ण आहेत.  देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.26% आहे.

देशभरात कोविड चाचण्या करण्याची क्षमता वाढवण्यात आली आहे. गेल्या 24 तासात, एकूण 10,22,204 जणांच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या. भारतात आतापर्यंत 76.67 कोटींपेक्षा अधिक (76,67,57,518) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशात चाचण्यांची क्षमता वाढवण्यात आली असून, सध्या देशात कोविडचा साप्ताहिक पॉझिटीव्हीटी दर 1.26% इतका तर दैनंदिन पॉझिटिव्हीटी दर 1.00इतका आहे.

***

ST/SP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1801564) Visitor Counter : 192