पंतप्रधान कार्यालय
उत्तराखंडमधील चंपावत येथे रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दु:ख
अपघातग्रस्तांसाठी पीएमएनआरएफच्या माध्यमातून मदतनीधी जाहीर
प्रविष्टि तिथि:
22 FEB 2022 2:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 फेब्रुवारी 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडमधील चंपावत येथे रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी अपघातग्रस्तांसाठी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी (पीएमएनआरएफ) मधून मदतनिधी जाहीर केला आहे .
पंतप्रधान कार्यालयाने ट्वीट केले आहे;
"उत्तराखंडातील चंपावत येथील दुर्घटना हृदयविदारक आहे. यात मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांप्रती शोक-संवेदना व्यक्त करतो. स्थानीय प्रशासन मदत आणि बचाव कार्य करत आहे: पंतप्रधान"
"पंतप्रधानांनी @narendramodi उत्तराखंडमधील अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पीएमएनआरएफ द्वारे प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. जखमींना उपचारासाठी 50,000 रुपये दिले जातील."
* * *
Jaydevi PS/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1800270)
आगंतुक पटल : 203
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam