कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय

अर्थसंकल्पोत्तर चर्चासत्र : उद्योग-कौशल्य जोडणीला मजबूत प्रोत्साहन

Posted On: 20 FEB 2022 3:36PM by PIB Mumbai

 

2022 चा अर्थसंकल्पात शिक्षण आणि कौशल्य क्षेत्रांवर योग्यरीत्या लक्ष केंद्रित केले असून त्याचे उद्दिष्ट त्यांचा प्रसार करणे, शिक्षणाचा दर्जा सुधारणे, क्षमता विकसित करणे, आणि डिजिटल कौशल्य या परिसंस्थेचे सबलीकरण  करणे हे आहे.

अर्थसंकल्पात घोषित केलेल्या उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीच्या मार्गांसाठी  विचारमंथन आणि चर्चा करण्यासाठी, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय (MSDE) आणि शिक्षण मंत्रालय, इतर मंत्रालयांसह, स्किल इंडिया या संकल्पनेवर आधारीत एका वेबिनार सत्राचे आयोजन करण्यात आहे - 'उद्योग-कौशल्य जोडणीला मजबूत प्रोत्साहन  या वेबिनारचे आयोजन सोमवार, 21 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी 12:15 ते 2:15 दरम्यान करण्यात आले आहे.

या वेबिनारमध्ये सरकारी अधिकारी, उद्योग तज्ञ आणि प्रमुख संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. हा वेबिनार  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होत असलेल्या चर्चासत्रांच्या मालिकेचा एक भाग आहे.  पंतप्रधान 'डिजिटल युनिव्हर्सिटी: मेकिंग वर्ल्ड क्लास हायर एज्युकेशन ऍक्सेसिबल फॉर ऑल' या विषयावरील पहिल्या वेबिनारला संबोधित करणार आहेत.

स्किल इंडिया वेबिनारचे सह-अध्यक्ष पर्यटन मंत्रालयाचे सचिव अरविंद सिंग, औद्योगिक नीती आणि संवर्धन विभागाचे (MSDE) सचिव राजेश अग्रवाल, राष्ट्रीय कौशल्य विकास परीषदेचे सचिव अनुराग जैन हे असतील.  या सत्रासाठी पॅनेल सदस्य म्हणून राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण परिषदेचे (NCVET) अध्यक्ष एन.एस. कलसी, नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि सहसचिव अंबर दुबे, टीमलीज सेवा उपाध्यक्ष मनीष सभरवाल असणार आहेत. या सत्राचे संचालन  राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाचे  (NSDC) महाव्यवस्थापक वेदमणी तिवारी करणार आहेत.

या सत्रादरम्यान, डिजिटल कौशल्ये वाढवून कौशल्य परिसंस्था बळकट करण्याच्या विस्तृत पैलूंवर चर्चा केली जाईल.

अर्थमंत्र्यांनी 2022 च्या अर्थसंकल्पात नुकत्याच केलेल्या घोषणेवर पॅनेलमधील सदस्य त्यांची मते मांडतील ज्यात डेश (DESH) स्टॅकवर चर्चा करण्यात येणार आहे. याशिवाय त्याचा उद्देश डिजिटल प्रशिक्षणाद्वारे नागरिकांना कौशल्य, पुनर्कौशल्य किंवा स्वत:ला उन्नत करण्यासाठी सक्षम करणे हा आहे.  पुढे या सत्रात गतिशील उद्योगांच्या  गरजा पूर्ण करण्यासाठी लक्ष्यित राष्ट्रीय कौशल्य पात्रता फ्रेमवर्क (NSQF) च्या यशस्वी अंमलबजावणीच्या पैलूंचा समावेश असेल. यामुळे उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा विस्तार आणि ड्रोन शक्ती योजनेद्वारे प्रशिक्षण, देशांतर्गत उत्पादन वाढविण्यात आणि रोजगार निर्मितीला मदत होईल.  वेबिनारदरम्यान पीएम गति शक्ती कार्यक्रमाशी संबंधित पैलूंवरही चर्चा केली जाईल.  या सत्रात पर्यटन आणि लॉजिस्टिकसारख्या क्षेत्रांवरही प्रकाश टाकला जाईल.

***

S.Thakur/S.Patgaonkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1799825) Visitor Counter : 205