गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

समरसता आणि सौहार्दाचे प्रतीक वंदनीय संत श्री रविदास जी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांची आदरांजली.


संत श्री रविदासजींनी आपल्या विचारांनी आणि रचनांनी समाजात आध्यात्मिक चेतना जागृत करून मानवजातीच्या कल्याणाचा मार्ग दाखवला.

प्रविष्टि तिथि: 16 FEB 2022 10:23AM by PIB Mumbai

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी, संत श्री रविदास जी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे. अमित शाह आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, '' “संत श्री रविदास जी यांनी  आपल्या विचारांनी आणि रचनांनी समाजात आध्यात्मिक चेतना जागृत करून मानवजातीच्या कल्याणाचा मार्ग दाखविला. त्यांनी दिलेला  एकता, समानता आणि कर्म प्राधान्यतेचा संदेश नेहमीच आपल्याला  मार्गदर्शक राहील.”


श्री शाह म्हणाले, “संत रविदासजींचे जीवन हे  प्रत्येक व्यक्तीला समान हक्क आणि न्याय देऊन समाजाला एकत्र आणण्यासाठी समर्पित होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील  केंद्र सरकार,संत रविदासजी यांनी दिलेल्या विचारांच्या  जाणिवेतून  प्रत्येक घटकाला विकासात भागीदार करून त्यांचे  जीवनमान उंचावण्यासाठी, सतत कार्यरत आहे.”

***

Jatdevi PS/SC/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1798678) आगंतुक पटल : 292
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Punjabi , Gujarati , Tamil , Telugu , Malayalam