पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी संत रविदास यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला त्यांचे स्मरण केले
Posted On:
15 FEB 2022 9:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 फेब्रुवारी 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संत रविदास यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला त्यांचे स्मरण केले आहे. त्यांनी असेही म्हटले आहे की त्यांच्या सरकारने केलेल्या प्रत्येक कृतीत आणि योजनेत पूज्य श्री गुरु रविदासजींची भावना समाहित आहे याचा मला अभिमान वाटतो.
ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले
"महान संत गुरु रविदास यांची उद्या जन्म-जयंती आहे. त्यांनी ज्याप्रकारे आपले आयुष्य समाजातून जात-पात आणि स्पृश्य-अस्पृश्य सारख्या कुप्रथा संपवण्यासाठी समर्पित केले जे आजही आपणा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे."
यानिमित्त मला संत रविदास जी यांच्या पवित्र स्थळांशी संबंधित काही गोष्टी आठवत आहेत. वर्ष 2016 आणि 2019 मध्ये मला तिथे नतमस्तक होण्याचे आणि लंगर घेण्याचे सौभाग्य लाभले होते. एक खासदार म्हणून मी हे ठरवले होते की या तीर्थस्थळाच्या विकासकामात कुठलीही उणीव भासू दिली जाणार नाही. "
"मला हे सांगताना अभिमान वाटत आहे की आमच्या सरकारचे प्रत्येक पाऊल आणि प्रत्येक योजनेत पूज्य श्री गुरु रविदास जी यांची भावना समाहित आहे. एवढेच नाही, काशी येथे त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सुरु असलेले बांधकाम भव्य आणि दिव्य स्वरूपात सुरु आहे. "
S.Tupe/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1798622)
Visitor Counter : 237
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam