सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने दिव्यांग व्यक्ती आणि जेष्ठ नागरिकांसाठी ‘सामाजिकअधिकारिता शिवीर’ आणि ‘एकात्मिक मोबाईल सेवा वितरण’ या दोन उपक्रमांची सुरुवात केली

Posted On: 12 FEB 2022 5:33PM by PIB Mumbai

 

एडीआयपी योजनेअंतर्गत दिव्यांग व्यक्तींना आणि केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या अधिपत्याखालील राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना साधने आणि मदत उपकरणे यांचे वितरण करण्यासाठी सामाजिकअधिकारिताशिवीरभरविण्यात येणार आहे. केंद्रीय दिव्यांग व्यक्तींचे सक्षमीकरण विभाग कृत्रिम अवयवांचे उत्पादन करणाऱ्या एएलआयएमसीओ या कंपनीच्या आणि मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन होणार आहे.

या कार्यक्रमात ब्लॉक अथवा पंचायत पातळीवरील 1391 दिव्यांग व्यक्ती आणि 553 ज्येष्ठ नागरिकांना 2 कोटी 33 लाख रुपये किमतीची 5286 साधने आणि मदत उपकरणांचे वितरण करण्यात येईल. त्यानंतर कोविड-19 महामारी लक्षात घेऊन विभागाने तयार केलेल्या प्रमाणित परिचालन प्रक्रियांची उपस्थितांना माहिती देण्यात येईल.

या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ.वीरेंद्र कुमार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. या कार्यक्रमात ते एएलआयएमसीओ कंपनीने विक्रीपश्चात सेवा देण्यासाठी विकसित केलेल्या एकात्मिक मोबाईल सेवा वितरण व्हॅनचे देखील उद्घाटन करतील. तसेच दिव्यांग व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांनी या साधने आणि मदत उपकरणांचा वापर करण्यासाठी जागृती अभियानाची देखील सुरुवात करण्यात येईल. भारत सरकारच्या एडीआयपी आणि आरव्हिवाय या योजनांमधून गेल्या काही काळात वितरीत झालेल्या साधनांची तसेच उपकरणांची दुरुस्ती, सुधारणा, जुळवणी आणि कृत्रिम अवयव तसेच इतर साधने बसविणे यासंबंधी मदत देखील यावेळी पुरविली जाईल. मध्य प्रदेश राज्य नागरी पुरवठा महामंडळाचे अध्यक्ष आणि बडमल्हेराचे आमदार प्रद्युम्न सिंग लोधी या कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी असतील.

एएलआयएमसीओचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक राजन सेहगल तसेच एएलआयएमसीओचे वरिष्ठ अधिकारी आणि जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी देखील यावेळी उपस्थित असतील.

***

S.Tupe/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1797900) Visitor Counter : 267