सांस्कृतिक मंत्रालय
केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय 15 आणि 16 फेब्रुवारीला ‘भारतातील वस्तुसंग्रहालये पुन्हा परिकल्पित करताना’ या विषयावरील अशा प्रकारच्या पहिल्याच जागतिक शिखर परिषदचे आयोजन करणार
प्रविष्टि तिथि:
08 FEB 2022 5:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 फेब्रुवारी 2022
केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय 15 आणि 16 फेब्रुवारीला ‘भरतातील वस्तुसंग्रहालये पुन्हा परिकल्पित करताना’ या विषयावरील अशा प्रकारच्या पहिल्याच जागतिक शिखर परिषदचे आयोजन करणार आहे.
भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीला 75 वर्षे पूर्ण आणि भारतीय जनतेचा वैभवशाली इतिहास यांचा उत्सव साजरा करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या अत्यंत महत्त्वाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमांचा भाग म्हणून ही शिखर परिषद आयोजित करण्यात आली आहे.
या जागतिक शिखर परिषदेत या संदर्भातील सर्वोत्तम पद्धती आणि धोरणे यांच्याबाबत चर्चा करण्यासाठी देशातील तसेच परदेशातील वस्तुसंग्रहालय विकसनाच्या आणि व्यवस्थापनाच्या क्षेत्राशी संबंधित प्रमुख व्यक्ती, विषय तज्ञ आणि अभ्यासक एकत्र येणार आहेत.
25 हून अधिक वस्तुसंग्रहालय तज्ञ आणि वस्तूसंग्रहालयविषयक व्यावसायिक या परिषदेत वस्तुसंग्रहालयांसाठी प्राधान्यक्रमाच्या गोष्टी आणि पद्धतींची नव्याने परिकल्पना करतील. माहितीच्या या देवाणघेवाणीतून नव्या वस्तु संग्रहालयांची उभारणी, पुनर्बांधणी आराखड्याची जोपासना आणि सध्या कार्यरत असलेल्या संग्रहालयांमध्ये पुन्हा चैतन्य निर्माण करणे यासाठीचा मार्गदर्शक नकाशा तयार करण्यात येणार आहे.
अधिक तपशीलासाठी कृपया येथे क्लिक करा
केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी.किशन रेड्डी या शिखर परिषदेचे उद्घाटन करणार आहेत.
या ऑनलाईन शिखर परिषदेत चार विस्तृत संकल्पनांचा समावेश करण्यात येईल: वास्तुरचना आणि कार्यविषयक गरजा; व्यवस्थापन; संकलन (संवर्धन आणि जतन यांसह) आणि शिक्षण तसेच प्रेक्षक सहभाग
उपरोल्लेखित दोन दिवशी ऑनलाईन पद्धतीने ही शिखर परिषद आयोजित करण्यात येईल आणि ती सर्व सर्वांसाठी खुली आहे.
या परिषदेत सहभागी होण्यासाठी कृपया या संकेतस्थळाचा वापर करा:
https://www.reimaginingmuseumsinindia.com/
अधिक तपशीलासाठी कृपया #MuseumsReimagined या हॅशटॅगचा मागोवा घ्या
* * *
S.Patil/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1796539)
आगंतुक पटल : 313