नौवहन मंत्रालय

किनारी जलमार्गांद्वारे माल वाहतूक


Posted On: 08 FEB 2022 2:57PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 8 फेब्रुवारी 2022

 

जलमार्गाद्वारे वाहतुकीला चालना देण्यासाठी सरकारने केलेल्या प्रयत्नांमुळे अंतर्देशीय जलवाहतूक (IWT) आणि किनारी जलमार्गाद्वारे माल वाहतूक वाढली आहे. वर्ष 2014-15 ते 2020-21 या कालावधीत राष्ट्रीय जलमार्गाशी (NWs) जोडलेल्या किनारी जलमार्गांसह राष्ट्रीय जलमार्गांद्वारे मालवाहतूक 2.76 पटीने वाढली आहे.

2009-10 ते 2013-14 पर्यंत राष्ट्रीय जलमार्गावरील अंतर्देशीय जलवाहतूक वाढीचा दर 1.5% होता. 2020-21 मधील वाढीचा दर 2019-20 च्या तुलनेत 13.5% आहे.

केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.


* * *

S.Tupe/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1796483) Visitor Counter : 171