कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

महामारीच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर उद्यापासून पूर्ण कार्यालयीन उपस्थितीला पुन्हा सुरूवात केली जाईल,असे केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे


डॉ.सिंग म्हणाले, सर्व स्तरावरील कर्मचाऱ्यांना, कोणत्याही सवलतीविना, 7 फेब्रुवारी 2022 पासून कार्यालयात नियमितपणे प्रत्यक्ष हजर राहावे लागेल

Posted On: 06 FEB 2022 9:07PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 फेब्रुवारी 2022

केंद्रीय राज्यमंत्री, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय; , (स्वतंत्र प्रभार)कार्मिक, सार्वजनिक तक्रार, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी आज संध्याकाळी असे  जाहीर केले आहे की, आज महामारीच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आणि कोविड रुग्णांची संख्या तसेच पॉझीटीव्हीटीच्या दरात झालेली घट लक्षात घेऊन,असा निर्णय घेण्यात आला आहे, की उद्यापासून कार्यालये पूर्ण क्षमतेने  पुन्हा सुरू करण्यात येतील आणि सर्व स्तरावरील कर्मचाऱ्यांना, कोणत्याही सवलतीविना , 7 फेब्रुवारी 2022 पासून नियमितपणे कार्यालयात प्रत्यक्ष हजर राहावे लागेल.

मंत्रीमहोदयांनी पुढे सांगितले की, की, कर्मचाऱ्यांनी  नेहमी मुखपट्टी (फेस मास्क) घातली आहे, आणि कोविड प्रतिबंधक  वर्तनाचे ते  योग्य पालन करत आहेत, हे सर्व  विभाग प्रमुखांना सुनिश्चित करावे लागेल.

पूर्वीच्या परिपत्रकानुसार 50% कार्यालयीन उपस्थितीचा नियम 15 फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आला होता,तो रद्दबातल ठरवला गेला आहे. संबंधित विभागांकडून माहिती प्राप्त झाल्यानंतर आणि परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर, कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने (DoPT) एक नवीन कार्यालयीन निवेदन (ऑफिस मेमोरँडम) जारी केले  आहे आणि त्यानुसार सर्व स्तरावरील सर्व कर्मचाऱ्यांना, कोणतीही सूट न घेता,उद्यापासून, म्हणजे 7 फेब्रुवारी 2022 पासून कार्यालयात हजर राहावे लागेल. कोणताही कर्मचाऱ्याला  "घरातून काम" हा  पर्याय उपलब्ध नसेल.

येथे हे नमूद करणे अगत्याचे आहे, की कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने ( DoPT) 3 जानेवारी 2022 रोजी कार्यालयीन निवेदनाद्वारे काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती आणि महामारीच्या परिस्थितीनुसार वेळोवेळी त्याचे पुनरावलोकन केले जात होते.

त्यानंतर घेतलेल्या आढाव्यात, ही मार्गदर्शक तत्त्वे 15 फेब्रुवारीपर्यंत वाढवणे योग्य मानले गेले होते.  अवर सचिव स्तराखालील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष संख्याबळाच्या 50% टक्क्यांपर्यंत समक्ष उपस्थिती मर्यादित ठेवण्याची मुभा होती आणि उर्वरित 50% टक्के कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगण्यात आले होते.  याशिवाय दिव्यांग व्यक्ती आणि गरोदर महिला कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्यापासून सूट देण्यात आली होती. घरून काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नेहमी दूरध्वनी आणि संपर्काच्या इतर माध्यमांवर उपलब्ध राहण्यास सांगण्यात आले होते.

दरम्यान, गेल्या महिन्यात डॉ जितेंद्र सिंह यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स घेतली आणि घरातून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी तसेच कोविड पॉझिटिव्ह आलेल्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला,त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली होती आणि त्यांचे मत आणि विचारही जाणून घेतले होते.

आता, पूर्वीच्या परिपत्रकानुसार, ज्यायोगे  50% कार्यालयीन उपस्थिती नियम 15 फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आला होता, तो रद्द करून कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग (DoPT) द्वारे एक नवीन कार्यालयीन निवेदन जारी करण्यात आले  आहे, ज्यात असे नमूद केले आहे की  सर्व स्तरावरील कर्मचारी, कोणतीही सूट न घेता, उद्यापासून म्हणजे 7 फेब्रुवारी 2022 पासून कार्यालयात प्रत्यक्ष हजर रहातील. कोणत्याही कर्मचार्‍यासाठी यापुढे "घरातून काम" हा  पर्याय उपलब्ध नसेल.

 

 

 

 

 

N.Chitale/S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1796006) Visitor Counter : 244