आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने 168.98 कोटी मात्रांचा टप्पा केला पार


गेल्या 24 तासात 47 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 95.64%,

गेल्या 24 तासात 1,27,952 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

भारतातील उपचाराधीन रुग्णांची सध्याची संख्या 13,31,648

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 11.21

Posted On: 05 FEB 2022 9:25AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, गेल्या 24 तासांत कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या  47 (47,53,081) लाखांहून अधिक मात्रा देऊन भारताने  168.98  (1,68,98,17,199 ) कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. 

1,87,05,424 सत्रातून हे लसीकरण करण्यात आले. आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,03,97,320

2nd Dose

98,95,501

Precaution Dose

36,09,410

FLWs

1st Dose

1,84,00,586

2nd Dose

1,73,03,841

Precaution Dose

45,95,770

Age Group 15-18 years

1st Dose

4,88,44,872

2nd Dose

45,80,539

Age Group 18-44 years

1st Dose

54,40,58,916

2nd Dose

41,40,88,065

Age Group 45-59 years

1st Dose

20,08,49,691

2nd Dose

17,35,80,375

Over 60 years

1st Dose

12,52,77,682

2nd Dose

10,81,41,859

Precaution Dose

61,92,772

Precaution Dose

1,43,97,952

Total

1,68,98,17,199

 

गेल्या 24 तासांत  2,30,814   कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून) वाढून  4,02,47,902   झाली आहे.

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर  95.64% झाला आहे.

गेल्या 24 तासात 1,27,952 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

 

देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 13,31,648 आहे. देशातील आतापर्यंतच्या एकूण बाधित रुग्णसंख्येच्या ती 3.16% आहे.

देशभरात चाचण्यांची क्षमता वाढवली जात आहे. गेल्या 24 तासांमध्ये एकूण  16,03,856   चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण  73.79  (73,79,32,233) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.


देशभरात चाचणी क्षमता वाढवण्यात आली असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या  11.21%  तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 7.98%आहे

***

ST/SK/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1795723) Visitor Counter : 180