पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान 5 फेब्रुवारी रोजी देणार हैदराबादला भेट
11 व्या शतकातील भक्तीमार्गाचे संत श्री रामानुजाचार्य यांच्या 216 फूट उंट पुतळ्याचे करणार राष्ट्रार्पण
पंतप्रधान आंतरराष्ट्रीय अर्ध-उष्ण कटीबंधीय कृषी संशोधन केंद्राच्या (ICRISAT) 50 व्या वर्धापन दिनाच्या सोहळ्याला आरंभ करणार, संस्थेच्या कृषी संशोधन केंद्राच्या दोन सुविधांचे उद्घाटन करणार
Posted On:
03 FEB 2022 5:49PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 फेब्रुवारी 2022 रोजी हैदराबादला भेट देणार आहेत दुपारी 2.45 च्या सुमारास ते हैदराबादच्या पटट्णसेरू आंतरराष्ट्रीय अर्ध-उष्ण कटीबंधीय कृषी संशोधन केंद्राच्या प्रांगणात आंतरराष्ट्रीय अर्ध-उष्ण कटीबंधीय कृषी संशोधन केंद्राच्या पन्नासाव्या वर्धापन दिनाच्या सोहळ्याचा आरंभ करतील.
11व्या शतकातील भक्तीमार्गीय संत रामानुजाचार्य यांच्या 216 फूट उंच पुतळा - समतेचा पुतळा- त्यांचे स्मरण करून देतो. त्यांनी विश्वास, जात आणि वंश यासह जीवनाच्या कोणत्याही स्तरावर समतेच्या कल्पनेचा पुरस्कार केला. पंचधातू म्हणजे सोने, चांदी, तांबे, पितळ आणि झिंक या पच धातूंनी हा पुतळा साकार झाला आहे. आणि हा बैठक स्थितीतील पुतळा जगात सर्वाधिक उंचीचा पुतळा आहे. हा 54 फूट उंच अश्या भद्रवेदी नामक इमारतीवर उभारला असून, त्या इमारतीमध्ये डिजिटल वैदिक ग्रंथालय व संशोधन केंद्र, प्राचीन भारतीय लिखाण, नाट्यगृह, शैक्षणिक गॅलरी आहे व त्यात रामानुजम यांचे कार्य प्रदर्शित केले आहे. या पुतळ्य़ाची कल्पना रामानुजाचार्य आश्रमाचे चिन्ना जीयार स्वामी यांची आहे.
या कार्यक्रमात रामानुजाचार्य यांच्या जीवन आणि शिकवणुक यांच्यावर 3D सादरीकरण करण्यात येणार आहे. समतेच्या पुतळ्याभोवताली असलेल्या दिव्य देसम च्या 108 कोरीव मंदिरांनाही पंतप्रधान भेट देतील.
रामानुजाचार्य यांनी राष्ट्रीयत्व, लिंग, वंश, जात किंवा पंथ या सर्वांना समान मानून लोकांच्या उद्धारासाठी अथक कार्य केले. समतेच्या पुतळ्याचे अनावरण हा बारा दिवस चालणाऱ्या रामानुजन सहस्त्राब्धी समारंभाचा एक भाग आहे. रामानुजाचार्य यांच्या 1000 व्या जयंतीनिमित्त हा सोहळा सध्या सुरू आहे.
या भेटीच्या सुरवातीलाच पंतप्रधान आंतरराष्ट्रीय अर्ध-उष्ण कटीबंधीय कृषी संशोधन केंद्राच्या ( इक्रीसॅट) 50 व्या वर्धापन दिनाच्या सोहळ्याला आरंभ करतील. आंतरराष्ट्रीय अर्ध-उष्ण कटीबंधीय कृषी संशोधन केंद्राच्या पिकांसाठी असलेल्या हवामानबदल संशोधन सुविधा तसेच जलद गतीने लागवण आणि वाढ सुविधा या दोन्हींचे ते उद्घाटन करणार आहेत. या दोन्ही सुविधा अशियातील आणि अर्ध-सहारण आफ्रिकेतील छोट्या जमिनीचे मालक असलेल्या शेतकऱ्यांसाठी आहेत. पंतप्रधान आंतरराष्ट्रीय अर्ध-उष्ण कटीबंधीय कृषी संशोधन केंद्राच्या खास तयार बोधचिन्हाचे अनावरण करतील आणि या सोहळ्याच्या संस्मरणार्थ टपाल तिकीट प्रदर्शित करतील.
आंतरराष्ट्रीय अर्ध-उष्ण कटीबंधीय कृषी संशोधन केंद्र ही एक आंतरराष्ट्रीय संस्था असून आशिया आणि अर्थ सहारातील वाळवंट यावर कृषीसंबंधी संशोधन करते. शेतकऱ्यांना सुधारित पिकांचे वाण आणि हायब्रीड पुरवते तसेच छोट्या शेतकऱ्यांना कोरडी जमीन लागवडीखाली घेऊन हवामान बदलाच्या संकटाला तोंड देण्यासाठी सहाय्य करते.
***
S.Thakur/V.Sahajrao/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1795161)
Visitor Counter : 328
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam