आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने 167.87 कोटी मात्रांचा टप्पा केला पार


गेल्या 24 तासात लसीच्या 55 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 95.14%

गेल्या 24 तासात 1,72,433 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

भारतातील उपचाराधीन रुग्णांची सध्याची संख्या 15,33,921

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 12.98%

Posted On: 03 FEB 2022 11:22AM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 फेब्रुवारी 2022

आज सकाळी 7 वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या अहवालानुसार, गेल्या 24 तासात लसीच्या 55 लाखांहून अधिक (55,10,693) मात्रा देऊन भारतातील कोविड-19  प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने 167.87 कोटी (1,67,87,93,137)  मात्रांचा टप्पा पार केला आहे.

1,85,37,996 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून या मात्रा देण्यात आल्या. आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,03,96,612

2nd Dose

98,86,305

Precaution Dose

35,09,973

FLWs

1st Dose

1,83,98,615

2nd Dose

1,72,79,961

Precaution Dose

42,84,468

Age Group 15-18 years

1st Dose

4,77,79,454

2nd Dose

21,63,015

Age Group 18-44 years

1st Dose

54,28,10,477

2nd Dose

41,05,04,684

Age Group 45-59 years

1st Dose

20,06,20,676

2nd Dose

17,27,32,572

Over 60 years

1st Dose

12,51,18,558

2nd Dose

10,76,27,091

Precaution Dose

56,80,676

Precaution Dose

1,34,75,117

Total

1,67,87,93,137

गेल्या 24 तासात 2,59,107 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या (महामारीच्या आरंभापासून) 3,97,70,414 झाली आहे.

परिणामी, भारतातील रुग्ण बरे होण्याचा दर 95.14% इतका आहे.

गेल्या 24 तासात 1,72,433 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

भारतातील उपचाराधीन कोरोनाबाधितांची संख्या सध्या 15,33,921आहे. देशात आढळलेल्या एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण   3.67% आहे.

देशभरात चाचण्यांची क्षमता सातत्याने वाढवली जात आहे. गेल्या 24 तासात एकूण 15,69,449 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 73.41 कोटींपेक्षा जास्त (73,41,92,614) चाचण्या केल्या आहेत.

देशभरात चाचणी क्षमता वाढवली असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 12.98% आहे आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर देखील 10.99% नोंदविण्यात आला आहे.

 

 

 

 

S.Tupe/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1794987) Visitor Counter : 205