अर्थ मंत्रालय
                
                
                
                
                
                    
                    
                        सरकार सनराईझ क्षेत्रातील शैक्षणिक संस्था, उद्योग आणि सार्वजनिक संस्थांसोबत सहकार्य करण्याव्यतिरिक्त  संशोधन विकासात योगदान देणार
                    
                    
                        
                    
                
                
                    Posted On:
                01 FEB 2022 6:17PM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी 2022
केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहारमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात सनराईझ क्षेत्रातील अपरिमित क्षमतेचे महत्त्व अधोरेखित केले आहे. या क्षेत्राला पाठबळ देणारी धोरणे, माफक नियमन, स्थानिक क्षमता उभारणीसाठी पोषक उपाययोजना आणि संशोधन आणि विकासाला प्रोत्साहन यावर सरकारचा भर असेल, असे अर्थमंत्र्यांनी या क्षेत्राच्या महत्त्वाकडे लक्ष वेधताना सांगितले.
सनराईझ क्षेत्रातील शैक्षणिक संस्था, उद्योग आणि सार्वजनिक संस्थांसोबत सहकार्य करण्याच्या प्रयत्नांव्यतिरिक्त सरकार संशोधन विकासात योगदान देईल, असे त्या म्हणाल्या. कृत्रिम बुद्धिमत्ता, भू-अवकाशीय प्रणाली आणि ड्रोन, सेमीकंडक्टर आणि त्यांच्या परिसंस्था, अंतराळ अर्थव्यवस्था, जनुकशास्त्र आणि औषधशास्त्र, हरित ऊर्जा आणि स्वच्छ वाहतूक प्रणाली या क्षेत्रांमध्ये  देशाच्या आधुनिकीकरणाची आणि शाश्वत विकासाला पाठबळ देण्याची प्रचंड मोठी क्षमता असल्याचे त्यांनी नमूद केले. ही क्षेत्र युवा वर्गाला रोजगार उपलब्ध करतात आणि भारतीय उद्योगाला अधिक कार्यक्षम आणि स्पर्धात्मक बनवत आहेत, असे त्या म्हणाल्या. 

 
 
U.Ujgare/S.Patil/P.Malandkar
 
 
 
 
 
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:  @PIBMumbai
@PIBMumbai    /PIBMumbai
 /PIBMumbai    /pibmumbai
 /pibmumbai   pibmumbai[at]gmail[dot]com
pibmumbai[at]gmail[dot]com
                
                
                
                
                
                (Release ID: 1794465)
                Visitor Counter : 356