PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 28 JAN 2022 8:29PM by PIB Mumbai

नवी दिल्ली/मुंबई28जानेवारी 2022

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती

भारताने गेल्या 24 तासात कोविड प्रतिबंधक लसीच्या 57 लाखाहून अधिक (57,35,692) मात्रा, पात्र नागरिकांना दिल्या असून आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार भारताने आतापर्यंत एकूण 164.44 कोटीहून अधिक (1,64,44,73,216) मात्रा दिल्या आहेत. एकूण 1,79,63,318 सत्रांद्वारे या मात्रा देण्यात आल्या  आहेत.

गेल्या 24 तासात 3,47,443 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून महामारीच्या सुरवातीपासून कोरोनाची लागण झालेल्यांपैकी एकूण 3,80,24,771 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. कोरोनातून रुग्ण बरे होण्याचा दर 93.60% झाला आहे.

गेल्या 24 तासात 2,51,209 नव्या रुग्णांची नोंद झाली.

देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 21,05,611 असून उपचाराधीन रुग्ण, एकूण पॉझिटीव्ह रुग्णांच्या 5.18%  इतके आहेत.

देशभरात  कोविड निदान चाचणी क्षमता वाढवण्यात येत असून देशात गेल्या 24 तासात 15,82,307 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत 72.37 कोटीहून अधिक (72,37,48,555) चाचण्या केल्या आहेत.

देशभरात चाचण्यांच्या क्षमतेत वाढ होत असताना साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सध्या 17.47% आहे. दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 15.88% आहे.

इतर अपडेट्स :

 

S.Thakur/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1793403) Visitor Counter : 144