इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाबाबत भविष्यातील रूपरेखेची दुसरी आवृत्ती प्रसिद्ध केली


या दुसऱ्या आवृत्तीत भारताला इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाच्या सध्याच्या 75 अब्ज अमेरिकी डॉलर्स वरून 2026 पर्यंत 300 अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या महासत्तेत परिवर्तित करण्यासाठी विस्तृत उद्दिष्टे आणि रूपरेखा मांडली आहे

Posted On: 24 JAN 2022 7:04PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 जानेवारी 2022

 

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने, आयसीईएच्या सहकार्याने, आज इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रासाठी 5 वर्षांचा दिशादर्शक आराखडा आणि भविष्यातील रूपरेखा (व्हिजन डॉक्युमेंट)  प्रसिद्ध केली.  याचे  शीर्षक "2026 पर्यंत 300 अब्ज डॉलर्स शाश्वत इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि निर्यात" असे आहे.  दोन भागांच्या व्हिजन डॉक्युमेंटची ही दुसरी आवृत्ती आहे.  यातील  पहिल्या आवृत्तीचे  शीर्षक “भारताची इलेक्ट्रॉनिक्स निर्यात आणि जीव्हीसी  मधील हिस्सा वाढवणे  " असे असून नोव्हेंबर 2021 मध्ये प्रसिद्ध करण्यात आले.

या अहवालात  भारताला इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाच्या  बाबतीत सध्याच्या 75 अब्ज अमेरिकी डॉलर्स  वरून 2026 पर्यंत 300 अब्ज अमेरिकी डॉलर्स मध्ये  परिवर्तित   करण्यासाठी   विविध उत्पादनांसाठी वर्षनिहाय आकडेवारी आणि उत्पादन अंदाज वर्तवला आहे.  इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात भारताच्या वाढीचे नेतृत्व करणार्‍या प्रमुख उत्पादनांमध्ये मोबाइल फोन, आयटी हार्डवेअर (लॅपटॉप, टॅब्लेट), ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स (टीव्ही आणि ऑडिओ), औद्योगिक इलेक्ट्रॉनिक्स, ऑटो इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक सुटे भाग ,एलईडी लाइटिंग, स्ट्रॅटेजिक इलेक्ट्रॉनिक्स, पीसीबीए, वापरण्यायोग्य आणि ऐकण्यायोग्य उपकरणे आणि दूरसंचार उपकरणे (चार्ट पहा) यांचा समावेश आहे.

मोबाइल उत्पादन वार्षिक उत्पादन सध्याच्या 30 अब्ज डॉलर्स वरून  100अब्ज डॉलर्स पार करण्याची  शक्यता असून  या महत्वाकांक्षी वाढीमध्ये क्षेत्राचा  40% हिस्सा  अपेक्षित आहे

जलद गतीने   दस्तावेज आणि धोरण आराखडा प्रसिद्ध केल्याबद्दल केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री  अश्विनी वैष्णव यांनी  इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आणि त्यांचे कौतुक केले. कार्यक्रमादरम्यान, वैष्णव यांनी अलीकडेच  झालेल्या संवादादरम्यान उद्योजकांनी  उपस्थित केलेल्या काही शंका दूर केल्या.  मोबाईल निर्मितीतील दुहेरी नियमनाच्या मुद्द्याबाबत उद्योगाकडून व्यक्त केली जाणारी भीती दूर करताना त्यांनी स्पष्ट केले   की दूरसंचार विभाग मोबाइल निर्मितीत प्रवेश करणार नाही आणि मोबाइल निर्मिती  नियामक व्यवस्था  आहे तशीच राहील.

याप्रसंगी बोलताना, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान  ,  कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री  राजीव चंद्रशेखर म्हणाले की, मंत्रालय भारतातील इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाच्या विस्तारावर लक्ष केंद्रित करत आहे.

Description: TableDescription automatically generated

Vision Document-Volume 2 "$300 Bn Sustainable Electronics Manufacturing & Export by 2026"

 

* * *

M.Chopade/S.Kane/D.Rane


(Release ID: 1792242) Visitor Counter : 304