पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान उद्या, 24 जानेवारीला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधणार
यावर्षी प्रथमच या विजेत्यांना ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून डिजिटल प्रमाणपत्रे देण्यात येणार
Posted On:
23 JAN 2022 10:06AM by PIB Mumbai
नवी दिल्ली 23 जानेवारी 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 24 जानेवारी 2022 रोजी दुपारी बारा वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधणार आहेत. वर्ष 2021 आणि 2022 या वर्षांसाठीचे प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्राप्त विजेत्यांना ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून डिजिटल प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत. पुरस्कार विजेत्यांना प्रमाणपत्रे देण्यासाठी प्रथमच या तंत्रज्ञानाचा वापर होत आहे.
अभिनव तंत्रज्ञान, समाजसेवा, शैक्षणिक क्षेत्र, क्रीडा, कला आणि संस्कृती तसेच शौर्य या सहा क्षेत्रांमध्ये अतुलनीय कामगिरी करणाऱ्या मुलांना भारत सरकारतर्फे प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार देण्यात येतात. यावर्षी, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2022 साठी बाल शक्ती पुरस्काराच्या विविध विभागांच्या अंतर्गत देशभरातील 29 मुलांची निवड करण्यात आली आहे. ही पुरस्कार विजेती मुले, दर वर्षी प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनात देखील भाग घेतात. प्रत्येक प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्याला सन्मान पदक, 1 लाख रुपयांचे रोख बक्षीस आणि प्रमाणपत्र दिले जाते. या वर्षी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2022 विजेत्यांच्या संबंधित बँक खात्यांमध्ये बक्षिसाची रोख रक्कम हस्तांतरित केली जाणार आहे.
****
ST/SC/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1791928)
Read this release in:
Malayalam
,
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada