पंतप्रधान कार्यालय
मुंबईत ताडदेव येथे इमारतीला लागलेल्या आगीतील जीवितहानी बद्दल पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त
पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून मदतीची घोषणा
Posted On:
22 JAN 2022 10:23PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत ताडदेव येथे इमारतीला लागलेल्या आगीत झालेल्या जीवितहानी बद्दल दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करत मृतांच्या कुटुबियांचे सांत्वन केले आहे आणि जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना केली आहे.
या आगीत ज्यांचे मृत्यू झाले आहेत त्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी दोन लाख रुपये मदत देण्यासही त्यांनी मंजुरी दिली आहे. जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये देण्यात येतील.
पंतप्रधान कार्यालयाने ट्वीट केले आहेः
"मुंबईत ताडदेव इथं इमारतीला लागलेल्या आगीचे वृत्त ऐकताच दुःख झाले. या दुर्घटनेत मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांकडे शोकभावना व्यक्त करतो आणि जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी म्हणून प्रार्थना करतो- पंतप्रधान नरेंद्र मोदी”
"मुंबईत ताडदेव इथल्या इमारतीमध्ये लागलेल्या आगीत मरण पावलेल्यांच्या कुटुंबांना पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधीमधून प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपये मदत देण्यात येतील- पंतप्रधान नरेंद्र मोदी"
***
S.Tupe/S.Patil/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1791867)
Visitor Counter : 243
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam