आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताच्या समग्र कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत लसीच्या 160 कोटी 43 लाखांहून अधिक मात्रा देण्याचे काम पूर्ण


गेल्या 24 तासात, कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या 70 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या

देशातील रोगमुक्ती दर सध्या 93.50%

गेल्या 24 तासात देशात 3,47,254 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद

आतापर्यंत ओमायक्रॉन प्रकारच्या कोरोना बाधितांची एकूण संख्या 9,692; कालपासून या प्रकारच्या बाधितांच्या संख्येत 4.36% वाढ

भारतातील सध्याची कोविड सक्रीय रुग्णसंख्या 20,18,825

साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 16.56% आहे

Posted On: 21 JAN 2022 9:33AM by PIB Mumbai

गेल्या 24 तासांच्या कालावधीत, कोविड प्रतिबंधक लसीच्या 70 लाखांहून अधिक (70,49,779) मात्रा देण्यात आल्यामुळे, आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने 160 कोटी 43 लाखांचा (1,60,43,70,484) टप्पा ओलांडला आहे.

 

देशभरात 1,72,80,628 सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले.आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, आतापर्यंत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रांची गटनिहाय विभागणी पुढीलप्रमाणे आहे.

 

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,03,91,052

2nd Dose

98,02,401

Precaution Dose

24,43,673

FLWs

1st Dose

1,83,89,891

2nd Dose

1,71,04,055

Precaution Dose

22,78,810

Age Group 15-18 years

1st Dose

3,96,06,464

Age Group 18-44 years

1st Dose

53,13,79,742

2nd Dose

38,12,54,261

Age Group 45-59 years

1st Dose

19,85,98,912

2nd Dose

16,44,76,409

Over 60 years

1st Dose

12,37,54,315

2nd Dose

10,27,51,056

Precaution Dose

21,39,443

Precaution Dose

68,61,926

Total

1,60,43,70,484

 

गेल्या 24 तासात 2,51,777 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे, देशात महामारीची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 3,60,58,806 झाली आहे.

 

परिणामी, भारतातील रोगमुक्ती दर आता 93.50% झाला आहे.

 

 

गेल्या 24 तासात, देशात 3,47,254 नव्या कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली.

 

 

भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या सध्या 20,18,825 इतकी आहे. देशात सध्या कोविड सक्रीय असलेल्या रुग्णांचे प्रमाण आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या 5.23% आहे.

 

कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याच्या क्षमतेचा विस्तार करण्याचे काम देशभरात सुरु आहे. गेल्या 24 तासात देशात एकूण 19,35,912 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 71 कोटी 15 लाखांहून अधिक (71,15,38,938) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

 

देशभरात कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याची क्षमता वाढविली जात असतानाच, देशातील साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 16.56% आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 17.94%.इतका आहे.

 

 

****

 

MC/Sampada/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1791400) Visitor Counter : 239