शिक्षण मंत्रालय
विद्यापीठे आणि महाविद्यालयांसाठी बौद्धिक संपदा हक्काविषयी मार्गदर्शन करणाऱ्या ऑनलाईन कार्यशाळेचे विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे आयोजन
Posted On:
17 JAN 2022 9:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 जानेवारी 2022
विद्यापीठ अनुदान आयोगाने आज विद्यापीठे आणि महाविद्यालयांसाठी ऑनलाइन कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेचा विषय ‘बौद्धिक संपदा हक्क ’ हा होता. शिक्षण मंत्रालयाच्या आयकॉनीक वीक अंतर्गत या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्राला शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाच्या सहसचिव, नीता प्रसाद, (ICC & Vig.), उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयाच्या अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग,महा नियंत्रक, पेटंट,डिझाईन आणि ट्रेड मार्क, सहसचिव राजेंद्र रत्नू, तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव प्रा रजनीश जैन, यांनी संबोधित केले.
स्वागतपर भाषणात प्रा रजनीश जैन यांनी बौद्धिक संपदा अधिकारांचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच देशाच्या प्रतिमेच्या बाबतीत त्याचे महत्त्व आणि देशाच्या ज्ञानाचे भंडार निर्माण करणे आणि त्याचे कायदेशीर पैलू या संदर्भात त्याचे महत्त्वही आपल्या भाषणात विशद केले.
यावेळी, शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील, उच्च शिक्षण विभागाच्या सहसचिव नीता प्रसाद यांनी या कार्यशाळेत विशेष भाषण करतांना, नवोन्मेष, संशोधन आणि सृजनशीलतेसाठी, बौद्धिक संपदेचे काय महत्त्व आहे, हे सांगितले.
उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयाच्या, अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग,महा नियंत्रक, पेटंट,डिझाईन आणि ट्रेड मार्क,विभागाचे सहसचिव, राजेंद्र रत्नू यांचे या कार्यशाळेत, बीजभाषण झाले. आपण सर्वांनी एकत्रित येऊन ऊर्जेचे रूपांतर सिनर्जी म्हणजेच एकत्रित ऊर्जेत करायचे आहे, असे सांगत, आपण तुकड्यातुकड्यांमध्ये काम करण्यापेक्षा परस्पर समन्वय राखून काम करणे ही काळाची गरज आहे, असे रत्नू म्हणाले.
उद्घाटनाच्या सत्रानंतर तंत्रज्ञान विषयक सत्र झाले. या सत्रात, तज्ञांनी बौद्धिक संपदा बाबत महत्वाची माहिती दिली. तसेच या संकल्पनेविषयी माहिती दिली.
* * *
N.Chitale/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1790596)
Visitor Counter : 187