PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 14 JAN 2022 8:56PM by PIB Mumbai

नवी दिल्ली/मुंबई 14 जानेवारी 2022

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती

गेल्या 24 तासांच्या कालावधीत, कोविड प्रतिबंधक लसीच्या 73 लाखांहून अधिक  (73,03,669) मात्रा देण्यात आल्यामुळे, आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने 155 कोटी 39 लाखांचा (1,55,39,81,819)टप्पा ओलांडला आहे.

देशभरात 1,65,59,387 सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले.

गेल्या 24 तासांत 1,09,345 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे, देशात (महामारीची  सुरुवात झाल्यापासून)आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 3,48,24,706 झाली आहे. परिणामी, भारतातील रोगमुक्ती दर आता 95.20% झाला आहे.

गेल्या 24 तासांत, देशात 2,64,202 नव्या कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली. भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या सध्या 12,72,073 इतकी आहे. देशात सध्या कोविड सक्रीय असलेल्या रुग्णांचे प्रमाण आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या 3.48% आहे.

कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याच्या क्षमतेचा विस्तार करण्याचे काम देशभरात सुरु आहे. गेल्या 24 तासांत देशात एकूण 17,87,457 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 69 कोटी 90 लाखांहून अधिक (69,90,99,084) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशभरात कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याची क्षमता वाढविली जात असतानाच, देशातील साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 11.83% आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 14.78%.इतका आहे.

 इतर अपडेट्‌स :-

 

 

N.Chitale/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1790019) Visitor Counter : 159