आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या समग्र कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत लसीच्या 155 कोटी 39 लाखांहून अधिक मात्रा देण्याचे काम पूर्ण


गेल्या 24 तासांत, कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या 73 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या

देशातील रोगमुक्ती दर सध्या 95.20%

गेल्या 24 तासांत देशात 2,64,202 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद

आतापर्यंत एकूण 5,753 ओमायक्राॅन रुग्ण आढळले आहेत.कालपासून त्यात 4.83%ची वाढ

भारतातील सध्याची कोविड सक्रीय रुग्णसंख्या 12,72,073

साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 11.83% आहे

Posted On: 14 JAN 2022 9:45AM by PIB Mumbai

गेल्या 24 तासांच्या कालावधीत, कोविड प्रतिबंधक लसीच्या 73 लाखांहून अधिक  (73,03,669) मात्रा देण्यात आल्यामुळे, आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने 155 कोटी 39 लाखांचा (1,55,39,81,819)टप्पा ओलांडला आहे.

देशभरात 1,65,59,387 सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले.

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रांची गटनिहाय विभागणी पुढीलप्रमाणे आहे

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,03,89,851

2nd Dose

97,68,352

Precaution Dose

14,72,348

FLWs

1st Dose

1,83,88,501

2nd Dose

1,70,28,660

Precaution Dose

10,80,733

Age Group 15-18 years

1st Dose

3,14,83,560

Age Group 18-44 years

1st Dose

52,15,18,598

2nd Dose

36,31,10,223

Age Group 45-59 years

1st Dose

19,70,42,104

2nd Dose

15,92,79,748

Over 60 years

1st Dose

12,27,95,849

2nd Dose

9,98,12,738

Precaution Dose

8,10,554

Precaution Dose

33,63,635

Total

1,55,39,81,819

 

गेल्या 24 तासांत 1,09,345 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे, देशात (महामारीची  सुरुवात झाल्यापासून)आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 3,48,24,706 झाली आहे.

 

परिणामी, भारतातील रोगमुक्ती दर आता 95.20% झाला आहे.

 

 

गेल्या 24 तासांत, देशात 2,64,202 नव्या कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली.

 

 

भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या सध्या 12,72,073 इतकी आहे. देशात सध्या कोविड सक्रीय असलेल्या रुग्णांचे प्रमाण आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या 3.48% आहे.

 

 

कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याच्या क्षमतेचा विस्तार करण्याचे काम देशभरात सुरु आहे. गेल्या 24 तासांत देशात एकूण 17,87,457 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 69 कोटी 90 लाखांहून अधिक (69,90,99,084) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

 

देशभरात कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याची क्षमता वाढविली जात असतानाच, देशातील साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 11.83% आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 14.78%.इतका आहे.

 

 

*****

MC/SP/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1789881) Visitor Counter : 238