कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जागतिक हिंदी दिनानिमित्त डब्ल्यूएचसीच्या संकेतस्थळावर हिंदी भाषेत विवरण दर्शविण्याचा युनेस्कोचा ऐतिहासिक निर्णय

प्रविष्टि तिथि: 11 JAN 2022 6:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 11 जानेवारी 2022

 

युनेस्कोच्या भारतातील स्थायी प्रतिनिधीमंडळाने काल जाहीर केले की जागतिक वारसा केंद्रांची माहिती देणाऱ्या युनेस्कोच्या संकेतस्थळावर जागतिक हिंदी दिनानिमित्त भारतातील युनेस्को जागतिक वारसा स्थळांची माहिती हिंदी भाषेत सादर करण्यास युनेस्कोच्या जागतिक वारसा केंद्राने मंजुरी दिली आहे.

केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ट्विटर द्वारे या निर्णयाचे स्वागत केले आहे. ते म्हणाले की, हिंदी भाषा हा प्रत्येक भारतीयासाठी आणि प्रत्येक हिंदी भाषा प्रेमीसाठी अभिमानाचा विषय आहे. जागतिक पातळीवर भारतीय भाषांची लोकप्रियता स्वागतार्ह आणि उत्साहवर्धक आहे असे केंद्रीय मंत्री प्रधान यांनी सांगितले.


* * *

N.Chitale/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1789165) आगंतुक पटल : 232
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Punjabi , Gujarati , Tamil , Telugu , Kannada