आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताच्या समग्र कोविड-19 लसीकरण मोहिमेद्वारे आतापर्यंत लसीच्या 151 कोटी 94 लाखांहून अधिक मात्रा देण्याचे काम पूर्ण


गेल्या 24 तासात, कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या 29 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या

देशातील रोगमुक्ती दर सध्या 96.62%

गेल्या 24 तासांत देशात 1,79,723 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

भारतातील सध्याची कोविड सक्रिय रुग्णसंख्या 7,23,619

साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 7.92% आहे

Posted On: 10 JAN 2022 9:51AM by PIB Mumbai

गेल्या 24 तासांच्या कालावधीत, कोविड प्रतिबंधक लसीच्या 29 लाखांहून अधिक  (29,60,975) मात्रा देण्यात आल्यामुळे, आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने 151 कोटी 94 लाखांचा (1,51,94,05,951) टप्पा ओलांडला आहे.

 

देशभरात  1,62,26,792 सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले. आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, नागरिकांना आतापर्यंत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रांची गटनिहाय विभागणी पुढीलप्रमाणे :

 

 

HCWs

1st Dose

1,03,88,899

2nd Dose

97,42,727

 

FLWs

1st Dose

1,83,87,219

2nd Dose

1,69,75,052

Age Group 15-18 years

1st Dose

2,38,07,879

 

Age Group 18-44 years

1st Dose

51,45,68,195

2nd Dose

35,25,37,574

 

Age Group 45-59 years

1st Dose

19,61,86,714

2nd Dose

15,63,00,659

 

Over 60 years

1st Dose

12,23,10,994

2nd Dose

9,82,00,039

Total

1,51,94,05,951

 

 

गेल्या 24 तासात 46,569 रुग्ण कोविड आजारातून बरे झाले. त्यामुळे, देशात (महामारीची सुरुवात झाल्यापासून) आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 3,45,00,172 झाली आहे.

 

परिणामी, भारतातील रोगमुक्ती दर 96.62% झाला आहे.

 

 

 

गेल्या 24 तासांत, 1,79,723 नव्या कोविडबाधितांची नोंद झाली.

 

 

भारतातील कोविड सक्रिय (उपचाराधीन) रुग्णसंख्या सध्या  7,23,619 इतकी आहे. देशात सध्या कोविड सक्रिय असलेल्या रुग्णांचे प्रमाण आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या 2.03% आहे.

 

 

कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याच्या क्षमतेचा विस्तार करण्याचे काम देशभरात सुरु आहे. गेल्या 24 तासात देशात एकूण 13,52,717 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 69 कोटी 15 लाखांहून अधिक (69,15,75,352) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशभरात कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याची क्षमता वाढविली जात असतानाच, देशातील साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 7.92% आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 13.29% इतका आहे.

 

 

***

MC/Sampada/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1788880) Visitor Counter : 172