रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड सेवा केंद्रांना 14 हजार टनांहून अधिक वैद्यकीय द्रवरूप ऑक्सिजनचा पुरवठा


प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला सहाय्य करण्यासाठी अन्नधान्याची विक्रमी वाहतूक

495 किमी टप्प्यात रेल्वेचा सेक्शनल विभागीय वेग वाढला

उत्तर रेल्वेवरील 70% किमी पेक्षा जास्त मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण

Posted On: 08 JAN 2022 3:28PM by PIB Mumbai

 

ऑक्सिजन गाड्या

पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश , उत्तराखंड आणि दिल्ली या राज्यांमधील रुग्णालये आणि कोविड केअर केंद्रांना पुरवठा

करण्यासाठी क्रायोजेनिक टँक आणि रोल-ऑन-रोल-ऑफ रोड टँकरमधून 14,403 टन ऑक्सिजन घेऊन जाणाऱ्या

858 विशेष मालगाड्या ग्रीन कॉरिडॉरद्वारे चालवण्यात आल्या.

 

मालवाहतूक

क्षेत्रीय आणि विभागीय स्तरावर बहू-शाखीय मालवाहतूक व्यापार विकास युनिट्स (BDU) स्थापन करण्यात आली आहेत. उत्तर रेल्वेवरील 44 गुड्स शेडचे नूतनीकरण केले जात आहे आणि अतिरिक्त लोडिंग-अनलोडिंग सुविधा पुरवल्या जात आहेत. राजधानी दिल्लीला सवलतीच्या वाहतूक दरात फळे आणि भाजीपाला यांचा सुरळीत पुरवठा करण्यासाठी उत्तर रेल्वेकडून वेगवेगळ्या राज्यांमधून किसान रेल देखील चालवल्या जात आहेत.

 

रेल्वे परिचालन

पंतप्रधानांनी हजरत निजामुद्दीन आणि वाराणसी ते गुजरातमधील केवडिया येथे नव्याने बांधलेल्या स्थानकापर्यंत रेल्वे सेवा सुरु केली. यामुळे उत्तरेकडील राज्यांतील लोकांना स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट देण्यासाठी प्रवासाची सोय झाली आहे. केएसआर आणि कांगडा व्हॅली हिलमार्गावरील सेवा देखील पूर्ववत करण्यात आल्या आहेत.

 

सुरक्षितता

सुरक्षिततेवर नेहमीच प्रामुख्याने भर देण्यात आला आहे.  टक्कर होऊन कोणतीही दुर्घटना घडलेली नाही आणि या विभागात गाडी रुळावरून घसरण्याचा दुर्घटनामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 44% घट झाली आहे. 2018-19 या वर्षात उत्तर रेल्वेवरील सर्व मानवरहित लेव्हल क्रॉसिंग हटवण्यात आली आहेत.

 

मालमत्तेची देखभाल

मालमत्तेची देखभाल आणि उन्नतीकरण नियमितपणे केले जाते. लखनौच्या आलमबाग कारखान्यात 14 दिवसांच्या विक्रमी वेळेत कार्यक्षम यांत्रिक साफसफाईसह एलएचबीची नियमितपणे दुरुस्ती-देखभाल केली जाते.

 

रेल्वे प्रकल्प

उत्तर रेल्वे यूएसबीआरएल मध्ये ऋषिकेश-कर्णप्रयाग ब्रॉडगेज लाइन आणि बिलासपूर-मनाली-लेह लाइनच्या एफएलएस या तीन हिमालयीन प्रकल्पांवर काम सुरू आहे.

यूएसबीआरएल प्रकल्पाच्या उर्वरित कटरा-बनिहाल मार्गावर प्रतिष्ठित चिनाब पुलाची कमान टाकण्याचे काम एप्रिल 2021 मध्ये पूर्ण झाले.

 

विद्युतीकरण

मिशन 100% विद्युतीकरणाच्या दिशेने रेल्वे काम करत आहे. उत्तर रेल्वेवरील 70% किमी पेक्षा जास्त मार्गांचे विद्युतीकरण पूर्ण झाले  आहे.

 

पर्यायी ऊर्जेचा वापर

सौर ऊर्जेच्या वापरासाठी, संपूर्ण विभागात ग्रीडशी संलग्न मीटर असलेले सौर ऊर्जा संयंत्रे उभारण्यात आली आहेत. 3251 टन कार्बन उत्सर्जन कमी करून त्यापासून 40 लाख युनिट वीज निर्मिती  केली जात आहे.

 

आरोग्य सेवा

उत्तर रेल्वेने आरोग्य केंद्रांना औषधे, इंजेक्शन आणि उपभोग्य वस्तूंचा अखंड पुरवठा सुरू ठेवला आहे. केंद्रांवर आरटी-पीसीआर चाचण्या केल्या जात आहेत..

 

क्रीडा

उत्तर रेल्वेचे कर्मचारी असलेल्या अनेक खेळाडूंनी विविध राष्ट्रीय आणि जागतिक क्रीडा स्पर्धांमध्ये भारताचा गौरव वाढवला आहे. टोकियो 2020 ऑलिम्पिकसाठी भारतीय संघात उत्तर रेल्वेचे 11 खेळाडू आणि प्रशिक्षक होते. ऑलिम्पिकमध्ये रवी कुमार दहिया याने रौप्य पदक आणि  बजरंग पुनियाने कुस्ती प्रकारात कांस्यपदक जिंकले.

***

S.Tupe/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1788551) Visitor Counter : 264