आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने 148.67 कोटी मात्रांचा टप्पा केला पार


गेल्या 24 तासात लसीच्या 91 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या

कोरोनामुक्तीचा दर सध्या 97.81%

गेल्या 24 तासात 90,928 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

भारतातील उपचाराधीन रुग्णांची सध्याची संख्या 2,85,401

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 3.47%

Posted On: 06 JAN 2022 9:54AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या अहवालानुसार, गेल्या 24 तासात लसीच्या 91 लाखांहून अधिक (91,25,099) मात्रा देऊन भारतातील कोविड-19  लसीकरण व्याप्तीने 148.67 कोटी (148,67,80,227)  मात्रांचा टप्पा पार केला आहे. 1,59,06,137 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून या मात्रा देण्यात आल्या.


आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

HCWs

1st Dose

1,03,88,544

2nd Dose

97,28,815

 

FLWs

1st Dose

1,83,86,576

2nd Dose

1,69,32,565

Age Group 15-18 years

1st Dose

1,27,60,148

 

Age Group 18-44 years

1st Dose

50,73,76,164

2nd Dose

34,33,77,115

 

Age Group 45-59 years

1st Dose

19,54,13,276

2nd Dose

15,36,92,217

 

Over 60 years

1st Dose

12,18,98,867

2nd Dose

9,68,25,940

Total

1486780227

 


गेल्या 24 तासात 19,206 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या  (महामारीच्या आरंभापासून) 3,43,41,009 झाली आहे.


परिणामी, भारतातील कोरोनामुक्तीचा दर 97.81% इतका आहे.

गेल्या 24 तासात 90,928 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली.


भारतातील उपचाराधीन कोरोनाबाधितांची संख्या सध्या 2,85,401 आहे. देशात आढळलेल्या एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.81% आहे.

 

देशभरात चाचण्यांची क्षमता सातत्याने वाढवली जात आहे. गेल्या 24 तासात एकूण 14,13,030 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 68.53 कोटींपेक्षा जास्त (68,53,05,751) चाचण्या केल्या आहेत.

देशभरात चाचणी क्षमता वाढवली असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 3.47% आहे आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर देखील 6.43% नोंदविण्यात आला आहे.

***

ST/SC/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1787934) Visitor Counter : 169