रेल्वे मंत्रालय

ईशान्य रेल्वेमार्गावरील 75% पेक्षा जास्त मार्गांचे आतापर्यंत विद्युतीकरण: 2022 पर्यंत 100% विद्युतीकरण: ईशान्य रेल्वेने गती कायम राखली

Posted On: 04 JAN 2022 3:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 जानेवारी 2022

ईशान्य रेल्वे, प्रामुख्याने प्रवासी-केंद्रित व्यवस्था असल्यामुळे, 2021 मध्ये जनतेला सुरक्षित, जलद, आरामदायी आणि विश्वासार्ह वाहतूक सुविधा प्रदान करण्यात प्रमुख विभागांपैकी एक  म्हणून स्थान मिळवले आहे. गेल्या वर्षी हाती घेण्यात आलेल्या प्रकल्पांची ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.

  • ईशान्य प्रदेश रेल्वेमार्गावर आतापर्यंत  75% पेक्षा जास्त मार्गांचे विद्युतीकरण: 2022 पर्यंत 100% विद्युतीकरण
  • 10 वेगवेगळ्या स्थानकांवर 24 एस्केलेटर उपलब्ध करून देण्यात आले- 8 वेगवेगळ्या स्थानकांवर 22 लिफ्ट आहेत
  • 47 रेल्वे स्थानके आदर्श स्थानके म्हणून विकसित केली आहेत- सर्व 295 पात्र स्थानकांमध्ये वायफाय सुविधा उपलब्ध
  • आरयूबी /एलएचएस/ आरओबीच्या माध्यमातून  आणि डायव्हर्शनच्या तरतुदीद्वारे 75 लेव्हल क्रॉसिंग बंद करण्यात आली
  • सर्व लेव्हल क्रॉसिंग गेट्स ज्यामध्ये एकूण पन्नास हजार पेक्षा जास्त वाहन युनिट्स (टीव्हीयू) आहेत ते इंटरलॉक केले आहेत- 50,000 पेक्षा कमी वाहन युनिट्स  असलेले 16 लेव्हल क्रॉसिंग गेट्स देखील इंटरलॉक केलेले आहेत
  • 78 किमी मार्गाचे  नूतनीकरण पूर्ण झाले-192 किमी प्लेन  ट्रॅक  आणि 145  टर्न आऊटचे स्क्रीनिंग  पूर्ण झाले
  • 26 प्रमुख माल वाहतुकीच्या  शेड चोवीस तास कार्यान्वित केल्या आहेत , मालगाड्यांचा सरासरी वेग वाढवला  आणि वर्षभर सातत्याने ताशी 50 किमी पेक्षा जास्त कायम राखला गेला.
  • मागील वर्षातील 3 तास 6 मिनिटांच्या तुलनेत माल चढवणे-उतरवण्याचा वेळ 13 मिनिटांनी कमी झाला  आहे.
  • ईशान्य रेल्वेमधील दोन प्रमुख ऑटोमोबाईल हँडलिंग टर्मिनल शेजारी देश नेपाळच्या वाहतुकीच्या गरजा पूर्ण करतात
  • ईशान्य रेल्वेची  सर्व रेल्वे रुग्णालये ऑक्सिजन संयंत्रांनी सुसज्ज आहेत
  • ईशान्य रेल्वेने राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार - 2021 अंतर्गत परिवहन श्रेणीत प्रथम पारितोषिक जिंकले

 

M.Chopade/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1787391) Visitor Counter : 139