शिक्षण मंत्रालय

केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते, नीट 3.0 (NEAT 3.0)आणि एआयसीटीईच्या नेमून दिलेल्या अभ्यासक्रमाची तांत्रिक पुस्तके प्रादेशिक भाषांमध्ये प्रकाशित


सामाजिकदृष्ट्या वंचित गटांना 253.72 कोटी रुपये किमतीच्या 12 लाख ‘नीट’ शिक्षणविषयक अभ्यासक्रमाच्या मोफत कूपन्सचेही वाटप

नीट (NEAT) मुळे देशातील डिजिटल दरी कमी होऊन, जगासाठी ज्ञान-आधारित आवश्यकतांची पूर्तता होईल- धर्मेंद्र प्रधान

Posted On: 03 JAN 2022 8:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 जानेवारी 2022

 

केंद्रीय शिक्षण आणि कौशल्या विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते, नीट-3.0 (NEAT 3.0) म्हणजे – ‘तंत्रज्ञानासाठी राष्ट्रीय शैक्षणिक सहकार्य’ चे उद्घाटन झाले. या उपक्रमामुळे, देशातील सर्व विद्यार्थ्यांना अद्ययावत अशा शिक्षण-तंत्रज्ञान आधारित शंका निरसन आणि अभ्यासक्रम, एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार आहेत. यावेळी, प्रधान यांच्या हस्ते, एआयसीटीईच्याअ तंत्रज्ञान विषयांवरील पुस्तकांचे प्रकाशनही करण्यात आले.

11c4c756-47a6-4f6a-8ee7-efa1bf06f7ee.jpg

नीट: 3.0 हा प्लॅटफॉर्म देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, वंचित विद्यार्थ्यांपर्यंत डिजिटल सुविधा पोहचवून, देशातील डिजिटल दरी कमी करण्यात अत्यंत उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा प्रधान यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केली. तसेच, जगाला ज्ञान-आधारित गरजांची पूर्तता करण्यात, देखील याअ प्लॅटफॉर्मचा मोठा उपयोग होणयर आहे, असेही ते म्हणाले .

नीट: 3.0 प्लॅटफॉर्मवर 58 जागतिक आणि भारतीय स्टार्ट अप कंपन्या असून विद्यार्थ्यांसाठी, 100 अभ्यासक्रम आणि ई- संसाधने उपलब्ध आहेत. ज्यातून, विद्यार्थ्यांना नोकरीसाठी आवश्यक कौशल्ये शिकता येतील, अशी माहिती प्रधान यांनी दिली.

c487de0f-7471-481c-ae1a-8ff5030aeafe.jpg

एआयसीटीसी ने स्किल इंडियाच्या सहकार्याने नीट प्लॅटफॉर्मसाठी अभ्यासक्रम तयार करावेत,जेणेकरुन, उदयोन्मुख क्षेत्रातील संधी शोधून, देशात रोजगारनिर्मितीला चालना देता येईल आणि तरुणांना भविष्यासाठी सज्ज करता येईल, असेही प्रधान म्हणाले. एआयसीटीसी आणि शिक्षण-तंत्रज्ञान कंपन्यांनी अगदी कमीतकमी पैशात, ई-संसाधने उपलब्ध करुन द्यावीत, अशी विनंतीही प्रधान यांनी केली.

आज, 12 लाखांपेक्षा जास्त आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना नीट (NEAT) 3.0 अंतर्गत 253 कोटी रुपयांचे मोफत एड-टेक कुपन्स मिळाले आहेत याबद्दल  प्रधान यांनी आनंद व्यक्त केला. वर्ष 2022 ची विद्यार्थ्यांसाठी ही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेली सर्वात मोठी भेट आहे, ते म्हणाले.

प्रादेशिक भाषांमधील तांत्रिक पुस्तकांबद्दल बोलताना प्रधान म्हणाले, भाषांचे वैविध्य ही आपली ताकद आहे आणि तिचा योग्य वापर करून नवोन्मेषी समाज तयार करणे हे महत्वाचे आहे. प्रादेशिक भाषेत शिक्षण घेतल्याने मुलांची विचार करण्याची क्षमता विकसित करेल आणि आपल्या युवकांना जागतिक नागरिक बनण्यात मदत करेल.

 

नीट NEAT:

शिकणाऱ्यांच्या सोयीसाठीच्या एकल प्लॅटफॉर्मवरच्या तरुणांना नोकरीच्या अधिक संधी मिळवून देण्यासाठी सर्वोत्तम विकसित तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी घेतलेला पुढाकार म्हणजे तंत्रज्ञानासाठी राष्ट्रीय शैक्षणिक सहकार्य (NEAT).  अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, शिक्षण मंत्रालय यात सुविधा पुरविण्याचे काम करत आहेत, त्याच बरोबर हे जास्तीत जास्त सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल हे सुनिश्चित करेल. नीट (NEAT) सोबत 58 तंत्रशिक्षण कंपन्या आहेत, ज्यांचाकडे 100 पेक्षा जास्त उत्पादने आहेत, जी नोकरी मिळविण्यासाठी आवश्यक कौशल्य, क्षमता वाढविणे आणि शिक्षणातील दरी मिटविण्यात मदत करतील.

* * *

Jaydevi PS/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1787250) Visitor Counter : 192