आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

निवडणुका होणाऱ्या पाच राज्यांमधील आरोग्यविषयक उपाययोजना आणि लसीकरणाच्या स्थितीचा केंद्राकडून आढावा


दैनंदिन आढाव्यासह जिल्हानिहाय साप्ताहिक नियोजनाच्या माध्यमातून सर्व पात्र लोकसंख्येच्या लसीकरणाला गती देण्याची सूचना

कोविड रुग्णसंख्येत अचानक होणारी वाढ रोखण्यासाठी चाचण्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढवणार

कोविड प्रतिबंधक नियमांची काटेकोर अंमलबजावणी

Posted On: 27 DEC 2021 10:26PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 डिसेंबर 2021

 

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी आज उत्तराखंड, गोवा, माणिपूर, उत्तर प्रदेश आणि पंजाब या विधानसभा निवडणुका होणाऱ्या पाच राज्यांमधील कोविड 19 प्रतिबंधात्मक सार्वजनिक आरोग्यविषयक उपाययोजना आणि लसीकरणाच्या स्थितीचा एका उच्चस्तरीय बैठकीत आढावा घेतला. उत्तराखंड आणि गोवा या राज्यांमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या मात्रेचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त असल्याची माहिती दिली. तर उत्तर प्रदेश, पंजाब आणि माणिपूरमध्ये लसीकरणाची व्याप्ती राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी असल्याचे सांगण्यात आले. आतापर्यंत लसींच्या 142.38 कोटी मात्रा देण्यात आल्या आहेत ज्यामध्ये 83.80 कोटी पहिल्या आणि 58.58 कोटी दुसऱ्या मात्रांचा समावेश आहे.

या राज्यांना सर्व पात्र लोकसंख्येला पहिली मात्रा देण्यासाठी आणि ज्यांच्या दुसऱ्या मात्रा बाकी असतील त्यांना दुसरी मात्रा देण्यासाठी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाची गती वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या. यासाठी जिल्हानिहाय साप्ताहिक लसीकरणाचे नियोजन करण्याची गरज आहे. यासाठी लसीकरणाच्या अंमलबजावणीच्या स्थितीचा दैनंदिन आढावा घेण्याची सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आली.

संक्रमित रुग्णांची माहिती तातडीने मिळवता यावी आणि त्यांच्यावर वेळेवर उपचार करता यावेत यासाठी आणि चाचण्या कमी झाल्यामुळे रुग्णसंख्येत अचानक वाढ होण्याची स्थिती टाळण्यासाठी  या राज्यांना चाचण्यांची संख्या खूप जास्त प्रमाणात वाढवण्याच्या देखील सूचना देण्यात आल्या.

कोविड प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन होत आहे, याची अतिशय काटेकोरपणे खातरजमा करावी आणि त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात,अशा सूचनाही राज्यांच्या अधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आल्या.

कोविड19 महामारीच्या व्यवस्थापनासाठी एक संपूर्ण सरकार या दृष्टीकोनातून केंद्र सरकार राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांना संपूर्ण सहकार्य करत आहे.


* * *

R.Aghor/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1785663) Visitor Counter : 246