नागरी उड्डाण मंत्रालय
एअर इंडिया आणि इंडियन एअरलाईन्सच्या सध्याच्या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी आणि प्रॉव्हिडन्ट फण्डाचे लाभ भारत सरकार देत राहणार
Posted On:
20 DEC 2021 4:02PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 डिसेंबर 2021
केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांचे हित लक्षात घेऊन, 25.10.2021 रोजी धोरणात्मक भागीदाराशी केलेल्या 'समभाग खरेदी करारात' त्याचा अंतर्भाव केला आहे.
सध्या लागू असलेल्या कायद्यानुसार, निर्गुंतवणुकीनंतर कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी म्हणजे उपदान आणि पीएफ म्हणजे भविष्यनिर्वाह निधीचे लाभ धोरणात्मक भागीदार देतात.
सध्याच्या एअर इंडिया आणि इंडियन एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यांच्या स्वयंयोगदानात्मक सेवानिवृत्ती निवृत्तीवेतन निधीच्या व्यवस्थापनाबद्दलची कर्मचारी आणि भारतीय जीवन विमा महामंडळ यांच्यातील व्यवस्था पूर्ववत राहील . तसेच, एअर इंडियाच्या निवृत्त आणि पात्र लाभार्थ्यांना वैद्यकीय लाभही सरकारकडून मिळू शकणार आहेत.
केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री (डॉ.जनरल व्ही.के.सिंग- निवृत्त) यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात आज ही माहिती दिली.
* * *
Jaydevi PS/J.Waishampayan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1783448)
Visitor Counter : 238