माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

प्रसार भारतीने भारतीय संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेसमवेत केलेल्या सामंजस्य करारावर केल्या स्वाक्षऱ्या

Posted On: 20 DEC 2021 3:53PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 डिसेंबर 2021


भारतीय संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रसार भारती आणि आयसीसीआर अर्थात भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद यांनी आज सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. आयसीसीआरशी संबंधित प्रख्यात कलाकारांच्या कार्यक्रमांचे दूरदर्शनच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वाहिन्यांवरून प्रसारण केले जाईल. नृत्य आणि संगीत विषयक कार्यक्रमांचे डीडी नॅशनल, डीडी इंडिया, दूरदर्शनच्या प्रादेशिक वाहिन्या आणि प्रसार भारती न्यूज सर्व्हिसेस (प्रसार भारतीचा डिजिटल मंच) यावर साप्ताहिक कार्यक्रमाच्या रूपात प्रसारण केले जाईल.

भारतीय संस्कृतीमधल्या सर्वोत्कृष्टतेचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांना दर्शन घडवण्याबरोबरच कलाकारांना दूरचित्रवाणी आणि डिजिटल मंच पुरवणे हा या सामंजस्य कराराचा उद्देश आहे.

आयसीसीआरने आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रम, संगीत, नृत्य यावर आधारित कार्यक्रमांचे दूरदर्शन, आयसीसीआरच्या सहकार्याने, अर्ध्या तासांच्या 52 भागांची निर्मिती करणार आहे.

दूरदर्शनचे महासंचालक मयंक कुमार अग्रवाल आणि दूरदर्शन, आयसीसीआरचे महासंचालक दिनेश के पटनाईक यांनी प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी  शशी शेखर वेम्पती, प्रसार भारतीचे सदस्य (वित्त) डी पी एस नेगी आणि प्रसार भारती आणि आयसीसीआरचे इतर वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या केल्या.

डिसेंबर 2021 पासून डिसेंबर 2024 या तीन वर्षाच्या काळासाठी हा सामंजस्य करार कार्यान्वित राहील.

* * *

S.Tupe/N.Chitale/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1783445) Visitor Counter : 265