आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

देशभरात व्हेंटिलेटरच्या उपलब्धतेबाबत सद्यस्थिती

Posted On: 14 DEC 2021 3:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 डिसेंबर 2021


कोविड-19 महामारीच्या व्यवस्थापनासाठी देशभरात व्हेंटिलेटरची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडून प्राप्त मागणीच्या आधारे राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना पुरवठ्यासाठी व्हेंटिलेटर खरेदी करण्याची मागणी नोंदवली. राज्य/केंद्रशासित प्रदेशांना प्रदान केलेल्या व्हेंटिलेटरची संख्या परिशिष्टात जोडलेली आहे.

या व्हेंटिलेटरच्या वापराबाबत राज्यांना विस्तृत प्रशिक्षण दिले गेले आहे आणि 19,000 हून अधिक डॉक्टर आणि निम-वैद्यकीय कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. व्हेंटिलेटर नेहमी पूर्णपणे कार्यरत राहतील याची खात्री करण्यासाठी राज्यांना सूचित करण्यात आले आहे. त्यांना व्हेंटिलेटरची देखभाल आणि सज्जता, वैद्यकीय गॅस पाइपलाइन प्रणालीत इष्टतम ऑक्सिजन दाबासह रुग्णालयाच्या पायाभूत सुविधांची तयारी, व्हेंटिलेटरसाठी उपभोग्य वस्तूंची पुरेशी उपलब्धता आणि प्रशिक्षित मनुष्यबळाद्वारे या व्हेंटिलेटरचे कार्यान्वयन सुनिश्चित करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांकडून प्राप्त मागणीनुसार महाराष्ट्राला 5554 व्हेंटिलेटर पुरवण्यात आले आहेत. 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारती प्रवीण पवार यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

Annexure

Details of Ventilators provided to States/UTs/Central Institutions based on demand projected by States/UTs

S.No.

State / UT / Central Government Institutions

Number of Ventilators provided

1

Andaman and Nicobar Islands

34

2

Andhra Pradesh

5610

3

Arunachal Pradesh

63

4

Assam

1000

5

Bihar

500

6

Chandigarh

109

7

Chhattisgarh

515

8

Dadra and Nagar Haveli and Daman & Diu

20

9

Delhi

1080

10

Goa

200

11

Gujarat

5700

12

Haryana

673

13

Himachal Pradesh

500

14

Jammu and Kashmir

908

15

Jharkhand

1410

16

Karnataka

2871

17

Kerala

480

18

Ladakh

130

19

Madhya Pradesh

1611

20

Maharashtra

5554

21

Manipur

247

22

Meghalaya

86

23

Mizoram

115

24

Nagaland

320

25

Odisha

617

26

Puducherry

107

27

Punjab

809

28

Rajasthan

1900

29

Sikkim

0

30

Tamil Nadu

2775

31

Telangana

1796

32

Tripura

92

33

Uttarakhand

800

34

Uttar Pradesh

5216

35

West Bengal

1480

36

Lakshadweep

57

37

Central Institutions

4813

 

* * *

M.Chopade/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1781327) Visitor Counter : 181