वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

"जगाने अजून ईशान्य भारताची प्रचंड क्षमता पाहिली नाही" : केंद्रीय मंत्री पियुष गोयल

Posted On: 10 DEC 2021 10:57AM by PIB Mumbai

 

“जगाने अजून ईशान्य भारताची प्रचंड क्षमता पाहिली नाही,” असे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी नवी दिल्ली येथे ‘मेघालयन एज’ या विक्री केंद्राच्या उदघाटन प्रसंगी सांगितले. मेघालयातील मलबेरी सिल्क तसेच शाल, बांबू, हस्तकला आणि ईशान्येकडील इतर विविध अनोख्या उत्पादनांसाठी  भारतातीलच नव्हे तर जगभरातील पर्यटकांसाठी मोठी बाजारपेठ आहे असे सांगून केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग, मंत्री पीयूष गोयल म्हणाले, "संपूर्ण जग तुमच्यासाठी खुले आहे."

राष्ट्रीय राजधानीच्या मध्यवर्ती भागात असलेल्या राज्याच्या छोटेखानी दुकानाची प्रशंसा करून, पीयूष गोयल यांनी स्थानिक कारागीर आणि राज्यातील 43,000 हून अधिक विणकरांना मेघालयची समृद्ध संस्कृती, वारसा, कला आणि विशिष्ट उत्पादने दाखवण्याची संधी उपलब्ध करून देणारे विक्री केंद्र सुरु केल्याबद्दल मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा यांची प्रशंसा केली. यामुळे राज्याच्या कुटीर उद्योगाला बळ मिळेल.


"मेघालयात आपले कारागीर, विणकर, हस्तकला साकारणारे लोक जे अद्भुत काम करत आहेत ते पाहिल्यानंतर मी एवढेच म्हणू शकतो की आपण जे पाहत आहोत ते हिमनगाचे केवळ एक टोक आहे, अफाट क्षमता  आहे, तुमची क्षमता मी पाहतो त्यापेक्षा खूप जास्त 
आहे, तुम्ही दाखवलेली तुमची क्षमता अफाट आहे,” असे गोयल म्हणाले.


मेघालयन एज स्टोअरच्या उदघाटनाची कालची संध्याकाळ सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या स्मृतींना समर्पित करताना गोयल म्हणाले की ते खरे कर्मयोगी होते आणि भारताला महान बनवण्याची त्यांना तळमळ होती.

***

ST/SK/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1780028) Visitor Counter : 160