पंचायती राज मंत्रालय

केंद्रीय ग्रामविकास आणि पंचायती राज मंत्री गिरीराज सिंह यांच्या हस्ते पंचायती राज संस्थांद्वारे 'शाश्वत विकास उद्दिष्टांचे स्थानिकीकरण' या अहवालाचे प्रकाशन

Posted On: 08 DEC 2021 3:46PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 डिसेंबर 2021

पंचायती राज्यमंत्री  कपिल मोरेश्वर पाटील यांच्या उपस्थितीत, केंद्रीय ग्रामविकास आणि पंचायती राज मंत्री गिरीराज सिंह यांनी 07-12-2021 रोजी पंचायती राज संस्थांद्वारे शाश्वत विकास उद्दिष्टांचे  (एसडीजी ) स्थानिकीकरण या अहवालाचे प्रकाशन केले.

या प्रसंगी (i) ग्रामपंचायत विकास आराखडा (जीपीडीपी ) च्या प्रगतीवर देखरेख ठेवणारा देखरेख डॅशबोर्ड आणि (ii) क्षमता बांधणी प्रशिक्षण व्यवस्थापन आणि पंचायती राज संस्थांचे निवडून आलेले प्रतिनिधी आणि कार्यकर्ते यांचे प्रशिक्षण पोर्टल अशा  दोन समर्पित डॅशबोर्डचा  केंद्रीय ग्रामविकास आणि पंचायती राज मंत्र्यांनी प्रारंभ केला. प्रशिक्षण व्यवस्थापन पोर्टलवरील लघु माहिती पुस्तिकेचे  प्रकाशनही करण्यात आले.

श्री गिरीराज सिंह यांनी हा माहितीपूर्ण अहवाल तयार करण्यासाठी  पंचायती  राज मंत्रालयाने स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीच्या प्रयत्नांची प्रशंसा केली.  शाश्वत विकासाची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कृती  योजना म्हणून हा अहवाल काम करेल.2030 पर्यंत शाश्वत विकासाची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भारताची वचनबद्धता त्यांनी अधोरेखित केली. पंचायती राज संस्थांच्या 32 लाख निवडून आलेल्या प्रतिनिधींना  शाश्वत विकासाची उद्दिष्ट साध्य करणे हे एक आव्हान मानून तळागाळात केंद्रीत  आणि एकत्रितपणे काम करण्यास सुरुवात करण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी बोलताना पंचायती राज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांनी, पंचायत स्तरावर उपजीविकेच्या संधीं वाढवण्यासाठी आणि अधिकाधिक  चांगल्या रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने, उद्योजकीय उपक्रम सुरु करण्याचे  आवाहन केले.  या अहवालाची प्रशंसा करताना,कपिल मोरेश्वर पाटील यांनी आशा व्यक्त केली की, पंचायती राज संस्थांच्या माध्यमातून शाश्वत विकास उद्दिष्टांचे  स्थानिकीकरण हा अहवाल समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत विकासाचे लाभ पोहोचवण्यासाठी मार्गदर्शक आराखडा म्हणून  काम करेल.पंतप्रधानांच्या दूरदृष्टीच्या आधारे,पंचायतींनी विश्वासाने आणि  आत्मविश्वासाने विकासकामे करावीत. ज्ञानाचा वाढलेला स्तर आणि योग्य नियोजनामुळे सर्वांगीण प्रगतीचा मार्ग मोकळा होईल आणि ग्रामीण भागातील गरिबी दूर होईल, हे केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्र्यांनी अधोरेखित केले.  

 

 

M.Chopade/S.Chavan/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1779267) Visitor Counter : 317