पंतप्रधान कार्यालय
सर्व पात्र नागरिकांना कोविड प्रतिबंधक लसीची दुसरी मात्रा देण्यासंदर्भात हिमाचल प्रदेशने देशात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल पंतप्रधानांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले
प्रविष्टि तिथि:
06 DEC 2021 3:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 डिसेंबर 2021
हिमाचल प्रदेशातील सर्व पात्र नागरिकांना कोविड प्रतिबंधक लसीची दुसरी मात्रा देण्याचे उद्दिष्ट पूर्ण करत देशात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले आहे.
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्या ट्विट संदेशावर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान म्हणाले;
“@jairamthakurbjp जी यांचे खूप खूप अभिनंदन. कोविड विरोधातील या लढ्यात हिमाचल प्रदेशच्या नागरिकांनी संपूर्ण देशासमोर एक आदर्श ठेवला आहे. लोकांची हीच निश्चयी वृत्ती नव्या भारताला शक्ती प्राप्त करून देईल.”
S.Tupe/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1778463)
आगंतुक पटल : 242
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam