राष्ट्रपती कार्यालय

पाचव्या आंतरराष्ट्रीय आंबेडकर चर्चासत्राच्या उद्घाटनसत्रात राष्ट्रपतींची उपस्थिती

Posted On: 02 DEC 2021 3:15PM by PIB Mumbai

 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज, 2 डिसेंबर 2021 रोजी नवी दिल्लीत पाचव्या आंतरराष्ट्रीय आंबेडकर चर्चासत्राचे उद्घाटन केले. अनुसूचित जाती आणि जमाती आमदार -खासदार फोरम आणि डॉं आंबेडकर चेंबर ऑफ कॉमर्स यांनी  संयुक्तरित्या या चर्चासत्राचे आयोजन केले होते.

यावेळी राष्ट्रपतींनी अशा  चर्चासत्राचे आयोजन केल्याबद्दल अनुसूचित जाती आणि जमाती आमदार  खासदार फोरमचे कौतुक केले. हा फोरम सातत्याने सामाजिक व आर्थिक न्यायाच्या बाबी अधोरेखीत करतो तसेच डॉ आंबेडकरांचे विचार व संकल्पनांचा प्रसार करण्याच्या कामी महत्वाची भूमिका बजावतो असेही राष्ट्रपतींनी यावेळी  नमूद केले. घटनात्मक हक्कांबरोबरच शिक्षण, व्यवसाय, संशोधन आणि आर्थित विकासावर  या चर्चासत्राचा भर असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यकत केला.

बाबासाहेब आंबेडकर समाजातील विवेकवादाला साद घालण्याच्या विचारांचे होते. फक्त कायदे करून हक्कांची जपणूक करता येणार नाही तर त्यासाठी समाजात नैतिक व सामाजित जाणीव असली पाहिजे असे ते म्हणत असत. त्यांनी नेहमीच अहिंसा आणि घटनात्मक मार्गावर भर दिला असे ते म्हणाले.

अनुसुचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या हितरक्षणासाठी आपल्या घटनेत अनेकवार तरतूदी करण्यात आल्या. शासनाने अनुसुचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या शैक्षणिक व आर्थिक हिताची विशेषकरून जोपासना केली पाहिजे असे घटनेच्या कलम 46 मध्ये नमूद केले आहे असे ते म्हणाले. तसेच त्यांना सामाजिक अन्याय व सर्व प्रकारच्या पिळवणूकीपासून संरक्षण देण्याबद्दलही  या कलमामध्ये नमूद केलेले आहे. या दिशानिर्देशांचे पालन करण्याच्या उद्देशाने अनेक संस्थांची उभारणी तसेच नियम करण्यात आले आहेत. यात अनेक सुधारणाही घडवून आणल्या गेल्या आहेत. पण तरीही आपल्या देशाने व समाजाने या संदर्भात अजून बराच पल्ला गाठायचा आहे असे ते म्हणाले.

या वंचित गटातील अनेकांना आपल्या हक्कांची व सरकार त्यांच्या कल्याणासाठी सरकार उचलत असलेल्या पावलांबद्द्दल काही माहिती नसते. म्हणूनच त्यांना त्यांच्या हक्कांबद्ल व सरकारच्या कामांबददल जागृत करणे ही या फोरमची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपतींनी केले. विकासाच्या वाटेवर मागे पडलेल्या अनुसूचित जाती व जमातींच्या लोकांना पुढे घेऊन जाणं ही फोरमची जबाबदारी आहे आणि हीच डॉ आंबेडकरांना खरी श्रद्धांजली असेल असे ते म्हणाले.

राष्ट्रपतींचे संपूर्ण भाषण वाचण्यासाठी येथे क्लिक करा

***

Jaydevi PS/V.Sahajrao/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1777216) Visitor Counter : 177