अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नोव्हेंबरमध्ये 1,32,526 कोटी रूपये सकल जीएसटी महसूल संकलित


गेल्या महिन्याच्या जीएसटी संकलनाचा टप्पा ओलांडला; जीएसटीची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च संकलन

नोव्हेंबर 2021 मध्ये गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या जीएसटी महसुलापेक्षा 25 टक्के अधिक महसूल; 2019-20 तुलनेमध्ये 27 टक्के जास्त महसूल

महाराष्ट्रात नोव्हेंबर 2021 मध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 24 टक्के अधिक जीएसटी महसूल संकलित

Posted On: 01 DEC 2021 3:04PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 डिसेंबर 2021

नोव्हेंबर 2021 मध्ये जीएसटी म्हणजेच  वस्तू आणि सेवा कराच्या माध्यमातून एकूण 1,31,526 कोटी रूपयांचा महसूल  संकलित झाला. त्यापैकी सीजीएसटी म्हणजेच केंद्रीय वस्तू आणि सेवा करापोटी 23,978 कोटी रूपये जमा झाले आहेत. तर एसजीएसटी म्हणजेच राज्य सरकारच्या वस्तू आणि सेवा करापोटी 31,127 कोटी रूपये जमा झाले आहेत. याशिवाय आयजीएसटीच्या माध्यमातून 66,815 कोटी रूपये जमा झाले आहेत. यामध्ये आयात मालावरील करापोटी जमा झालेल्या 32, 165 कोटी रूपयांचा समावेश आहे. तसेच अधिभार 9,606 कोटी रूपये जमा झाला आहे. यामध्ये आयातीवरील कराचे 653 कोटी रूपये समाविष्ट आहेत.

सरकारच्यावतीने नियमित हिशेब चुकता करण्याच्या पद्धतीनुसार आयजीएसटीमधून 27,273 कोटी रूपये सीजीएसटीला आणि 22,655 कोटी रूपये एसजीएसटीला देण्यात आले आहेत. सर्व देणी चुकती केल्यानंतर नोव्हेंबर 2021 या महिन्यात केंद्र आणि राज्य सरकारांना सीजीएसटीच्या माध्यमातून 51,251 कोटी रूपये आणि एसजीएसटीच्या माध्यमातून 53,782 कोटी रूपये महसून मिळाला आहे.

सलग दुसऱ्या महिन्यात सकल जीएसटी महसूल संकलनामध्ये 1.30 लाख कोटी रूपयांचा टप्पा ओलांडला गेला आहे. नोव्हेंबर 2021 चे जीएसटी संकलन गेल्यावर्षीच्या नोव्हेंबर महिन्यापेच्क्षा 25 टक्क्यांनी जास्त आहे. तसेच 2019-20 पेक्षा 27 टक्क्यांनी जास्त आहे. या महिन्यामध्ये आयात करण्यात आलेल्या वस्तूंवरील करापोटी 43 टक्के अधिक महसूल जमा झाला आहे. तर देशांतर्गत झालेल्या उलाढालीमधून मिळणारा महसूल याच स्त्रोताव्दारे गेल्या वर्षी याच महिन्यात संकलित महसुलापेक्षा 20 टक्के अधिक आहे. यामध्ये सेवांच्या आयातीचाही समावेश आहे.

नोव्हेंबरमधील जीएसटी महसूल हा जीएसटीची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून दुस-या क्रमांकाचे सर्वोच्च संकलन झाले आहे. यापूर्वी एप्रिल 2021 मध्ये सर्वोच्च महसून संकलित झाला होता. तो वर्षाखेरच्या महसुलाशी संबंधित होता. त्यामध्ये तिमाहीतील करविवरण पत्रे जमा करण्यात आल्याचाही परिणाम दिसून आला.  महसूल संकलनाच्या या आकडेवारीवरून अर्थव्यवस्था झपाट्याने सुधारत असल्याचे दिसून येत आहे.

सर्वाधिक जीएसटी महसूल संकलनाचा नवीन ट्रेंड म्हणजे आर्थिक विषयक घेतलेली नवीन धोरणे, प्रशासकीय उपाय योजना यांचा परिणाम आहे. करचुकवेगिरी करणा-यांचा शोध घेण्यासाठी उपाय योजले जात आहेत. यामध्ये विवरण पत्र न भरणे, बनावट पावत्या वापरणे अशा प्रकारे व्यवहारामध्ये गडबड करणा-यांना शोधण्यासाठी ई-वे बिल, आय.टी. साधनांच्या मदतीने केंद्रीय कर अंमलबजावणी संस्था कार्यरत आहेत आणि करचोरीची प्रकरणे शोधून काढण्यात येत आहेत.

जीएसटी महसूल संकलन वृद्धीसाठी गेल्या एका वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात उपक्रम हाती घेण्यात आले. यामध्ये कार्यप्रणालीची क्षमता वाढवणे, विवरण पत्र अखेरच्या मुदतीनंतर आले तर नॉन-फायलर्सना अनुमती न देणे, ऑटो-पॉप्युलेशन ऑफ रिटर्न्स, इ-वे बिल ब्लॉक करणे, नॉन-फायलर्ससाठी इनपुट टॅक्स क्रेडिट पास करणे, नॉन-फायलर्समुळे गेल्या काही महिन्यांमध्ये विवरण भरण्यामध्ये निरंतर सुधारणा होत आहे.

महाराष्ट्रात नोव्हेंबर 2021  महिन्यामध्ये विक्रमी जीएसटी महसूल संकलन झाले . गेल्या वर्षीच्या तुलनेत  24 टक्के वृद्धी झाल्याची नोंद आहे. राज्यात नोव्हेंबर 2021 मध्ये 18,656 कोटी रूपये जीएसटी महसूल संकलन झाले. गेल्या वर्षी याच महिन्यात म्हणजे नोव्हेंबर 2020 मध्ये महाराष्ट्रात 15,001 कोटी रूपये जीएसटी महसूल संकलित झाला होता.

येथे खाली देण्यात आलेल्या तक्त्यामध्ये चालू वर्षातल्या मासिक सकल जीएसटी महसुलाचा कल दर्शविण्यात आला आहे. नोव्हेंबर 2020 च्या तुलनेमध्ये नोव्हेंबर 2021 मध्ये प्रत्येक राज्यांमध्ये जमा झालेल्या जीएसटी महसुलाची राज्यनिहाय आकडेवारी आहे.

नोव्हेंबर, 2021 मध्ये जीएसटी महसूल वृद्धीची राज्यनिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे -

State

Nov-20

Nov-21

Growth

Jammu and Kashmir

360

383

6%

Himachal Pradesh

758

762

0%

Punjab

1,396

1,845

32%

Chandigarh

141

180

27%

Uttarakhand

1,286

1,263

-2%

Haryana

5,928

6,016

1%

Delhi

3,413

4,387

29%

Rajasthan

3,130

3,698

18%

Uttar Pradesh

5,528

6,636

20%

Bihar

970

1,030

6%

Sikkim

223

207

-7%

Arunachal Pradesh

60

40

-33%

Nagaland

30

30

2%

Manipur

32

35

11%

Mizoram

17

23

37%

Tripura

58

58

-1%

Meghalaya

120

152

27%

Assam

946

992

5%

West Bengal

3,747

4,083

9%

Jharkhand

1,907

2,337

23%

Odisha

2,528

4,136

64%

Chhattisgarh

2,181

2,454

13%

Madhya Pradesh

2,493

2,808

13%

Gujarat

7,566

9,569

26%

Daman and Diu

2

0

-94%

Dadra and Nagar Haveli

296

270

-9%

Maharashtra

15,001

18,656

24%

Karnataka

6,915

9,048

31%

Goa

300

518

73%

Lakshadweep

0

2

369%

Kerala

1,568

2,129

36%

Tamil Nadu

7,084

7,795

10%

Puducherry

158

172

9%

Andaman and Nicobar Islands

23

24

5%

Telangana

3,175

3,931

24%

Andhra Pradesh

2,507

2,750

10%

Ladakh

9

13

46%

Other Territory

79

95

20%

Centre Jurisdiction

138

180

30%

Grand Total

82,075

98,708

20%

यामध्ये वस्तूंच्या आयातीवरील जीएसटीचा समावेश करण्यात आलेला नाही.

 

 

 

 

Jaydevi PS/S.Bedekar/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1776797) Visitor Counter : 208