PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 29 NOV 2021 8:35PM by PIB Mumbai

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0020FX3.png https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001BPSF.jpg

  • 122.41 cr vaccine doses have been administered so far under Nationwide Vaccination Drive
  • Recovery Rate currently at 98.34%; Highest since March 2020
  • 9,905 recoveries in the last 24 hours increases Total Recoveries to 3,40,08,183
  • 8,309 new cases in the last 24 hours
  • India's Active caseload stands at 1,03,859; lowest in 544 days
  • Active cases account for less than 1% of total cases, currently at 0.30%; Lowest since March 2020
  • Daily positivity rate (1.09%) less than 2% for last 56 days
  • Weekly Positivity Rate (0.85%) less than 1% for last 15 days
  • 64.02 cr Total Tests conducted so far

#Unite2FightCorona

#IndiaFightsCorona

Image

Image

नवी दिल्‍ली/मुंबई, 29 नोव्‍हेंबर 2021

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती

भारताने गेल्या 24 तासात कोविड प्रतिबंधक लसीच्या  42,04,171  मात्रा, पात्र नागरिकांना दिल्या असून आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार भारताने आतापर्यंत एकूण 122.41 कोटीपेक्षा जास्त  (1,22,41,68,929) मात्रा दिल्या आहेत. एकूण 1,26,81,072 सत्रांद्वारे मात्रा देण्यात आल्या आहेत.

गेल्या 24 तासात 9,905 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून महामारीच्या सुरवातीपासून कोरोनाची लागण झालेल्यांपैकी एकूण 3,40,08,183 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. कोरोनातून रुग्ण बरे होण्याचा दर 98.34% झाला आहे.

सलग 155 दिवसांपासून 50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद होत असून केंद्र आणि राज्य सरकार/केंद्र शासित प्रदेश यांच्या समन्वित प्रयत्नांचा हा परिणाम आहे. गेल्या 24 तासात 8,309 नव्या रुग्णांची नोंद झाली.

देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 1,03,859 आहे. उपचाराधीन रुग्ण, एकूण पॉझिटीव्ह रुग्णांच्या 0.30% असून मार्च 2020 पासून सर्वात कमी आहे.

चाचण्या करण्याच्या क्षमतेत वाढ सुरु असून देशात गेल्या 24 तासात 7,62,268 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत 64.02 कोटीहून अधिक  (64,02,91,325) चाचण्या केल्या आहेत. देशभरात चाचण्यांच्या क्षमतेत वाढ होत असताना साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सध्या 0.85% असून गेले  15 दिवस 1% पेक्षा कमी आहे. दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 1.09% असून गेले 56  दिवस 2% पेक्षा कमी आणि 91 दिवस 3% पेक्षा कमी आहे.

 

इतर अपडेट्स :

  • लसीच्या 24.61 कोटी पेक्षा जास्त शिल्लक आणि वापरलेल्या नाहीत अशा मात्रा राज्ये आणि केंद्र शासित प्रदेश आणि खाजगी रुग्णालयांकडे उपलब्ध आहेत.
  • जगात नव्या रूपातला SARS-CoV-2 (ओमिक्रॉन) आढळल्याच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय प्रवाश्यांसाठी भारताने सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या.
  • राष्ट्रीय आरोग्य प्रणाली संसाधन केंद्राने 2017-18 या वर्षासाठी राष्ट्रीय आरोग्य लेखा अंदाज पाचवा अहवाल जारी केला.

 

* * *

S.Tupe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1776279) Visitor Counter : 146