नागरी उड्डाण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कुशीनगर विमानतळावरून देशांतर्गत विमानसेवा सुरू


'उडान' अंतर्गत दिल्ली ते कुशीनगर दरम्यानचे पहिले उड्डाण

Posted On: 27 NOV 2021 4:28PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर 2021

 

RCS-UDAN (प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजना – उडे देश का आम नागरिक) अंतर्गत दिल्ली आणि कुशीनगर दरम्यानच्या पहिल्या उड्डाणाने 26.11.2021 रोजी उत्तर प्रदेशातील नव्याने उद्घाटन झालेल्या कुशीनगर विमानतळावरून देशांतर्गत विमानसेवा सुरू झाली. उडान योजनेंतर्गत देशाला अधिक चांगली हवाई कनेक्टिव्हिटी सक्षम करण्यासाठी नागरी हवाई वाहतूक मंत्रालय आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्या बांधिलकी आणि चिकाटीमुळे या मार्गावरील विमानसेवा सुरू झाली आहे. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 20 ऑक्टोबर 2021 रोजी कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केले होते.

कुशीनगर हे आंतरराष्ट्रीय बौद्ध तीर्थक्षेत्र आहे. येथे भगवान गौतम बुद्धांचे महापरिनिर्वाण झाले. हा प्रदेश बौद्ध सर्किटचा केंद्रबिंदू देखील आहे, ज्यामध्ये लुंबिनी, सारनाथ, गया येथील तीर्थक्षेत्रे आहेत. कुशीनगर विमानतळ कार्यान्वित झाल्यामुळे हा प्रदेश थेट राष्ट्रीय आणि जागतिक पर्यटकांशी आणि यात्रेकरूंशी जोडला जाईल.

भारतीय विमानतळ प्राधिकरणाने उत्तर प्रदेश सरकारच्या सहकार्याने अंदाजे 260 कोटी रुपये खर्च करून 3600 चौरस मीटरमध्ये पसरलेल्या नवीन टर्मिनल इमारतीसह कुशीनगर विमानतळ विकसित केले आहे. नवीन टर्मिनल गर्दीच्या वेळेत 300 प्रवाशांना हाताळण्यासाठी सुसज्ज आहे.

स्पाइसजेटला RCS-UDAN 4.0 अंतर्गत कुशीनगर-दिल्ली मार्ग प्रदान करण्यात आला. या मार्गावरील हवाई वाहतूक आदरातिथ्य, पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेवर गुणात्मक प्रभाव म्हणून काम करेल.

आजमितीस, उडान योजनेंतर्गत 6 हेलीपोर्ट आणि 2 वॉटर एरोड्रोमसह 395 हवाई मार्ग आणि 63 विमानतळ कार्यान्वित करण्यात आले आहेत.

विमान सेवेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.

Flight Number

Origin

Destination

Airline

Departure

Arrival

Frequency

SG2987

Delhi

Kushinagar

SpiceJet

12:00

13:35

1,3,5,7

SG2988

Kushinagar

Delhi

SpiceJet

13:55

15:50

1,3,5,7

 

G.Chippalkatti/V.Joshi/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1775593) Visitor Counter : 267