आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारतात कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण 116.87 कोटीहून अधिक


गेल्या 24 तासात सुमारे 33 लाखाहून अधिक मात्रा देण्यात आल्या

भारतात रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 98.31%

देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 8,488 नवे रुग्ण

देशातली उपचाराधीन रुग्णसंख्या 1,18,443

साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर (0.93%) गेल्या 59 दिवसापासून 2% पेक्षा कमी

Posted On: 22 NOV 2021 9:33AM by PIB Mumbai

भारताने गेल्या 24 तासात कोविड प्रतिबंधक लसीच्या  32,99,337 मात्रा, पात्र नागरिकांना दिल्या असून आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार भारताने आतापर्यंत एकूण 116.87 कोटीपेक्षा जास्त  (1,16,87,28,385) मात्रा दिल्या आहेत. एकूण 1,20,77,324 सत्रांद्वारे मात्रा देण्यात आल्या आहेत.

यामध्ये यांचा समावेश आहे-

HCWs

1st Dose

1,03,82,290

2nd Dose

94,07,092

 

FLWs

1st Dose

1,83,76,108

2nd Dose

1,63,19,085

 

Age Group 18-44 years

1st Dose

44,29,75,971

2nd Dose

19,15,97,004

 

Age Group 45-59 years

1st Dose

18,08,59,227

2nd Dose

11,12,04,851

 

Over 60 years

1st Dose

11,32,78,631

2nd Dose

7,43,28,126

Total

1,16,87,28,385

 

 

गेल्या 24 तासात 12,510 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून महामारीच्या सुरवातीपासून कोरोनाची लागण झालेल्यांपैकी एकूण  3,39,34,547 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. 

कोरोनातून रुग्ण बरे होण्याचा दर  98.31% झाला आहे.

सलग 148 दिवसांपासून  50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद होत असून केंद्र आणि राज्य सरकार/ केंद्र शासित प्रदेश यांच्या समन्वित प्रयत्नांचा हा परिणाम आहे.

गेल्या 24 तासात 8,488 नव्या रुग्णांची नोंद झाली.

देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 1,18,443 आहे. उपचाराधीन रुग्ण, एकूण पॉझिटीव्ह रुग्णांच्या  0.34% असून मार्च 2020 पासून सर्वात कमी आहे.

चाचण्या करण्याच्या क्षमतेत वाढ सुरु असून देशात गेल्या 24 तासात 7,83,567 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत 63.25 कोटीहून अधिक (63,25,24,259) चाचण्या केल्या आहेत.

देशभरात चाचण्यांच्या क्षमतेत वाढ होत असताना साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सध्या 0.93% असून गेले   59 दिवस 2% पेक्षा कमी आहे. दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 1.08% असून गेले 49 दिवस 2% पेक्षा कमी आणि 84 दिवस 3% पेक्षा कमी आहे.

***

 

STupe/NC/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1773889) Visitor Counter : 185