आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड - 19 अद्ययावत माहिती
Posted On:
22 NOV 2021 9:11AM by PIB Mumbai
राष्ट्रव्यापी लसीकरण अभियानाअंतर्गत आत्तापर्यंत 116.87 कोटी कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रा देण्यात आल्या
रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.31 टक्के आहे; मार्च 2020 पासून हा दर सर्वात अधिक
गेल्या 24 तासात बरे झालेल्या रूग्णांची एकूण संख्या 12,510 पर्यंत वाढल्याने कोविडमुक्त झालेल्यांची एकूण संख्या 3,39,34,547
गेल्या 24 तासामध्ये 8,488 नव्या रूग्णांची नोंद, गेल्या 538 दिवसातील सर्वात कमी
भारतातील सक्रिय रूग्णसंख्या 1,18,443; गेल्या 534 दिवसांतील सर्वात कमी संख्या
सक्रिय रुग्णसंख्या एकूण रुग्णसंख्येच्या सध्या एक टक्क्यांपेक्षाही कमी आहे. सध्या हा दर 0.34 टक्के आहे. मार्च 2020 पासून हा दर सर्वात कमी
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (1.08%) इतका असून गेल्या 49 दिवसांपासून हा दर 2 टक्के पेक्षा कमी
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.93%) इतका आहे, गेल्या 59 दिवसांपासून हा दर 2 टक्क्यांपेक्षा कमी
आत्तापर्यंत एकूण 63.25 कोटी चाचण्या करण्यात आल्या
****
STupe/SampadaP/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1773883)
Visitor Counter : 201