ग्रामीण विकास मंत्रालय
प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीणला 5 वर्षे पूर्ण
राज्ये/केंद्रशासित प्रदेशांसह ग्रामीण विकास मंत्रालयाने आवास दिन साजरा करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले
या योजनेअंतर्गत 1.63 घरांचे बांधकाम पूर्ण झाले
योजनेच्या सुरु झाल्यापासून राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना 1,47,218.31 कोटी रुपये जारी करण्यात आले
Posted On:
20 NOV 2021 2:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर 2021
या योजनेला 5 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आवास दिन साजरा करण्याच्या पूर्वसंध्येला, 20 नोव्हेंबर 2021 रोजी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी आवास दिन साजरा करण्यासाठी भूमिपूजन, गृह प्रवेश, नमुना घरांना लाभार्थ्यांची भेट, पंतप्रधान आवास योजना ग्रामीण बाबत लाभार्थ्यांचे जागरुकीकरण यांसारखे विविध उपक्रम हाती घेतले आहेत. सर्वांसाठी घरे या उदात्त उद्दिष्टाची पूर्तता सुनिश्चित करून, मंत्रालय राज्य सरकारच्या भागीदारीने हे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे.
वर्ष 2022 पर्यंत “सर्वांना घरे” देण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण (PMAY-G) ही सुधारित ग्रामीण गृहनिर्माण योजना, 20 नोव्हेंबर 2016 रोजी सुरु केली जी एप्रिल 2016 पासून लागू करण्यात आली. या कार्यक्रमात 2022 पर्यंत सर्व मूलभूत सुविधांनी युक्त 2.95 कोटी पीएमएवाय -जी घरे पूर्ण करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.
प्रत्यक्ष स्थिती -
योजनेच्या प्रारंभापासून एकत्रित लक्ष्याच्या तुलनेत पीएमएवाय -जी अंतर्गत कामगिरी खालीलप्रमाणे आहे:
Cumulative target under PMAY-G from 2016-17 to 2020-21
|
2.62 Crore
|
Registrations
|
2.20 Crore
|
Houses Geo-tagged
|
2.16 Crore
|
No. of house sanctioned
|
2.09 Crore
|
No. of 1st instalments paid
|
1.98 Crore
|
No. of 2nd instalments paid
|
1.80 Crore
|
No. of 3rd instalments paid
|
1.63 Crore
|
House completed
|
1.63 Crore
|
आर्थिक स्थिती:
पीएमएवाय -जी योजनेंतर्गत आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना एकूण जारी करण्यात आलेली रक्कम 7775.63 कोटी रुपये इतकी आहे. योजना सुरू झाल्यापासून राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना एकूण जारी करण्यात आलेली रक्कम पुढीलप्रमाणे :
(15 नोव्हेंबर 2021 पर्यंतची माहिती )
Financial year
|
Total Funds released to States/UTs
(Amount in Rs. Crore)
|
2016-17
|
16,058
|
2017-18
|
29,889.86
|
2018-19
|
29,331.05
|
2019-20
|
27,305.84
|
2020-21
|
36,857.93
|
2021-22
|
7,775.63
|
Total
|
1,47,218.31
|
S.Tupe/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1773455)
Visitor Counter : 299