माहिती आणि प्रसारण मंत्रालय

52 व्या इफ्फीमधील आदरांजली विभागात बर्ट्रांड टवेर्नियर, ख्रिस्तोफर प्लमर, जॉन - क्लूड कॅरीये आणि जॉन - पॉल बेल्मोन्डो यांच्या चित्रपटांचा समावेश

Posted On: 17 NOV 2021 4:12PM by PIB Mumbai

 

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दरवर्षी  चित्रपट उद्योगाने गमावलेल्या दिग्गजांचे चित्रपट या महोत्सवात दाखवून त्यांना आगळी श्रद्धांजली वाहिली जाते. 52व्या इफ्फी मध्ये आदरांजली विभागाद्वारे नजीकच्या भूतकाळात आपण गमावलेल्या ज्येष्ठांना आदरांजली दिली जाईल. या महोत्सवात बर्ट्रांड टवेर्नियर, ख्रिस्तोफर प्लमर, जॉन क्लूड कॅरीये आणि जॉन - पॉल बेल्मोन्डो यांचे चित्रपट दाखवले जातील.

 

52 व्या इफ्फी मध्ये आदरांजली विभागात खालील चित्रपट दाखविण्यात येतील -

1.        बर्ट्रांड टवेर्नियर

बर्ट्रांड टवेर्नियर कृत - अ संडे इन द कंट्री

फ्रांस | 1984 | फ्रेंच | 90 मी.| रंगीत

कथासार : मॉन्सुअर लॅडमिरल, हा वयोवृद्ध विधुर चित्रकार पॅरिसबाहेरच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या घरात राहत असतो. एकदा त्याला भेटायला  त्याचा मुलगा गोझागे येतो. तेव्हा लॅडमिरल त्याला असे संकेत देतो की, गोझागे हा अतिशय आळशी आहे आणि त्याने आपली बहिण आयरिन प्रमाणे उत्साही आणि मुक्त असावे. लॅडमिरलला देखील अधिक स्वतंत्र व्हावेसे वाटत असते. जेव्हा आयरिन त्यांच्या सोबत राहायला येते तेव्हा कुटुंबातला तणाव आणखी वाढतो.

 

2.       ख्रिस्तोफर प्लमर

रिडली स्कॉट कृत ऑल द मनी इन द वर्ल्ड

अमेरिका, इंग्लंड | 2017 | इंग्लिश | 135 मी. | रंगीत

कलाकार: ख्रिस्तोफर प्लमरमिशेल विलियम्स, मार्क वोह्ल्बर्ग, रोमिअन डूरीस, चार्ली प्लमर

कथासार: हा चित्रपट 16 वर्षाच्या जॉन पॉल गेटी III याचे अपहरण आणि त्याची आई गेलचे, त्याच्या अब्जाधीश आजोबांनी (ख्रिस्तोफर प्लमर) खंडणीची रक्कम द्यावी म्हणून केलेले निकराचे प्रयत्न, या भोवती फिरतो. गेटी सिनियर याला नकार देतात. आपल्या मुलाचे आयुष्य अधांतरी असताना गेल आणि गेटी याचे सल्लागार मार्क वोह्ल्बर्ग, वेळे विरुद्धच्या शर्यतीत एकत्र येतात आणि शेवटी खऱ्या आणि टिकून राहणाऱ्या प्रेमाचे मोल पैशापेक्षा जास्त असते हे सिद्ध होते.

 

3.       जॉन-क्लूड कॅरिये

अँट इटर्निटी'ज  गेट - ज्युलियन श्नबेल

पटकथा: जॉन-क्लूड कॅरिये, लुई  कुगलबर्ग, ज्युलियन श्नबेल

अमेरिका, फ्रांस | 2018 | इंग्लिश, फ्रेंच | 110 मी.| रंगीत

कथासार: हा चित्रपट सुप्रसिद्ध चित्रकार व्हिन्सेंट व्हॅन गॉ च्या चित्रांमधील विविध दृष्यांचा एक पुष्पगुच्छ आहे, व्हॅन गॉ च्या आयुष्यातील अनेक प्रसिद्ध घटना, त्याच्याविषयीच्या  दंतकथा आणि काही चित्रे यावरुन इथे एक कथा बांधण्यात आली आहे. कला निर्मितीतून आपल्यातील हृदय जिवंत ठेवण्याची संधी आपल्याला मिळते जी आपल्या जीवनाचा उद्देश देणारी असते. व्हॅन गॉच्या आयुष्यात  भयंकर अत्याचार आणि शोकांतिका होऊनहीं, तो अत्यंत समृद्ध असे आयुष्य जगला. ज्यात, जादू होती, निसर्गाशी संवाद होता आणि अस्तित्वाला अद्भुत शक्ती देणारे बळ होते. व्हॅन गॉ याची  चित्रे अत्यंत आशावादी आहेत. त्याचा जगण्याकडे बघण्याचा हा विलक्षण दृष्टिकोन आपल्यासमोर काही अव्यक्त गोष्टीच्या माध्यमातून   अतिशय ठळकपणे मांडला गेला आहे.

 

4.   जॉन - लक गोडार्ड कृत जॉन - पॉल बेल्मोन्डो

ब्रेथलेस

देश | वर्ष | भाषा | कालावधी : फ्रान्स | 1960 | फ्रँच | 90 मिनिटे. |रंगीत

कलाकार: जीन-पॉल बेल्मोन्डो, जीन सेबेर्ग, डॅनियल बोलाँगर

कथासार: मिशेल, हा एक भुरटा चोर, एक कार चोरी करतो आणि त्याच प्रयत्नांत घाईगडबडीत एका पोलिस अधिकाऱ्याचा खून करतो. त्यामुळे, तो पळून जाऊन इटलीत लपण्याचा प्लान बनवतो तसेच  त्याची प्रेयसी पॅट्रीशियाला त्याच्यासोबत यावं यासाठी तो तिचं मन वळवण्याचा प्रयत्न करतो.

 

***

Jaydevi PS/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1772601) Visitor Counter : 178