पंतप्रधान कार्यालय
पद्म पुरस्कार विजेते श्री बिरेन कुमार बसाक यांनी दिलेल्या भेटवस्तूबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे मानले आभार
Posted On:
13 NOV 2021 9:08AM by PIB Mumbai
पंतप्रधान, श्री नरेंद्र मोदी यांनी सुप्रसिध्द विणकर आणि पद्म पुरस्कार विजेते श्री बिरेन कुमार बसाक यांच्याशी झालेल्या त्यांच्या संवादाचे स्मरण केले आणि त्यांनी दिलेल्या भेटवस्तूबद्दल त्यांचे आभार मानले.
आपल्या ट्विटरसंदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले:
"श्री बिरेन कुमार बसाक हे पश्चिम बंगालमधील नाडीया येथील रहिवासी आहेत. ते एक सुप्रसिद्ध विणकर असून , त्यांनी विणलेल्या साड्यांतून भारतीय इतिहास आणि संस्कृतीचे विविध पैलू ते चित्रित करतात. पद्म पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधताना त्यांनी मला अशी भेटवस्तू दिली आहे,जी मला खूपच आवडली आहे."
****
Jaydevi PS/SP/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1771386)
अभ्यागत कक्ष : 327
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam